राज्यात दसरा मेळाव्यावरुन घमसान सुरु आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा यावरुन रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. अशातच बिग बॉस फेम
राज्यात दसरा मेळाव्यावरुन घमसान सुरु आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा यावरुन रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. अशातच बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले(Abhijeet Bichukle) यांनी जनतेला एक सल्ला दिला आहे. सातत्याने वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत असलेले बिचकुले यांनी जनतेला सभा ऐकायलाच जाऊ नका असा सल्ला दिल्याने भूवया उंचावल्या आहेत. शिवाय शिवसेना आणि शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोप हे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आहेत. त्यामुळे जनतेने आपलाच विचार करावा असे बिचुकले यांनी सुचवले आहे.

COMMENTS