Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परंपरेत अडथळा आणू नका

कार्तिकी पूजेवरून मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन

मुंबई ः राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापतांना दिसून येत असून, मराठा क्रांती मोर्चाकडून कार्तिकी एकादशीला होणार्‍या उपमुख्यमंत्र्यांच्या

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार
सीमाप्रश्‍नी आज विधिमंडळात ठराव मांडणार
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचनात वाढ

मुंबई ः राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापतांना दिसून येत असून, मराठा क्रांती मोर्चाकडून कार्तिकी एकादशीला होणार्‍या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार्‍या शासकीय महापूजेला जोरदार विरोध दर्शवला असून पंढरपुरात येऊ न देण्याचा इशारा दिला आहे. यावरुनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूजेला विरोध करण्याची आपली संस्कृती नसल्याचे म्हणत अडथळा न आणण्याचे आवाहन मराठा बांधवांना केले आहे.
आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची समृध्द परंपरा आहे. विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविक आषाढीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. तसेच एकादशीच्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणे योग्य नाही. त्यामुळे या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकादशीला महाराष्ट्रात विठ्ठलनामाचाच गजर व्हायला हवा. सारा परिसर जयघोषाने दुमदुमुदे… असे आवाहनही त्यांनी मराठा बांधवांना केले. दरम्यान, कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या महापुजेसाठी मनोज जरांगे पाटील यांना बोलावण्यात यावं. जरांगे पाटलांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापुजा व्हावी.. अशी मागणीही मराठा बांधवांनी केली होती. मराठा क्रांती मोर्चाकडून तसे पत्रही मंदिर समितीला देण्यात आले होते.

COMMENTS