पुणे ः कसबा विधानसभा पोटनिवडणुक निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार गिरीश बापट आणि भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने
पुणे ः कसबा विधानसभा पोटनिवडणुक निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार गिरीश बापट आणि भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांची भेट घेतली. यावेळी हेमंत रासने यांच्या भेटीत कार्यकर्त्यांना संवाद साधून पुन्हा जोमाने कामाला लागण्याची सूचना चंद्रकात पाटील यांनी केली. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. या पराभवानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हेमंत रासने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी रासने यांच्या घरी कसबा मंडलाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भेटीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पोटनिवडणुकीत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले. संघर्ष हा भाजपचा स्थायीभाव आहे. संघर्षाच्या बळावरच आपण अनेक आव्हानांचा अतिशय समर्थपणे सामना करुन ती आव्हाने परतावून लावली. पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या सदैव पाठीशी आहे. त्यामुळे खचून न जाता सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे, आगामी काळात विजय आपलाच आहे, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. यानंतर सर्वांनी आता जिंकेपर्यंत लढायचं, असा निर्धार व्यक्त केला. हेमंत रासने आणि त्यांच्या कुटुंबियांशी ही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संवाद साधला. त्यांनाही कामाला लागण्याची सूचना केली. त्यावर हेमंत रासने यांच्या पत्नी सौ. मृणाली रासने यांनी ’निवडणुकीच्या काळात सर्वांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. यातून सर्वांचे रासने कुटुंबासोबत अतूट नाते निर्माण झाले आहे. हे नाते जपण्यासोबतच अजून पुढे वाढवणार’ असल्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, रासने यांच्या भेटीपूर्वी चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार गिरीश बापट यांचीही सदिच्छा भेट घेतली. यावेळी पाटील यांनी खासदार गिरीश बापट यांच्या तब्येची विचारपूस केली. ’बापट साहेब आपण काळजी घ्या, आणि लवकर बरे व्हा!’ अशी सदिच्छा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
COMMENTS