साईबाबांच्या चरणी 28 लाखांचा मुकुट दान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साईबाबांच्या चरणी 28 लाखांचा मुकुट दान

अहमदनगर प्रतिनिधी - वर्षेअखेरिस शिर्डी साईबाबा मंदिरात भक्तांची गर्दी उसळली आहे. भक्त साईबाबांच्या चरणी लाखो रूपये दान करत असल्याचे आपण पाहिले आहे.

आ. जगतापांचा कोट्यवधीचा भ्रष्टाचार…मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
प्रतीक्षा भांगरे बुद्धीमापन स्पर्धेत राज्यात द्वितीय
सव्वाशेवर जागांसाठी तब्बल बारा हजारावर आले अर्ज

अहमदनगर प्रतिनिधी – वर्षेअखेरिस शिर्डी साईबाबा मंदिरात भक्तांची गर्दी उसळली आहे. भक्त साईबाबांच्या चरणी लाखो रूपये दान करत असल्याचे आपण पाहिले आहे. यादरम्यान दरम्यान शिर्डीच्या साईबाबांना हिऱ्यांनी जडलेला सोन्याचा मुकुट दान आला आहे. युनायटेड किंगडम येथील इंग्लंडमधील साईभक्त कनारी सुबारी पटेल यांनी हा हिरेजडीत सुवर्ण मुकूट साईबाबांना दान दिला आहे. साधारणपणे साईबाबांना सोन्याचे मुकुट नेहमीच येत असतात, पण यावेळी बाबांना पूर्णपणे हिऱ्यांनी जडलेला मुकुट दान आला आहे.सोन्याच्या या मुकुटाचे वजन 368 ग्रॅम असून त्याची किंमत 28 लाख रुपये सांगीतली जात आहे. प्रत्येक आरतीच्या वेळी साईबाबांना मुकूट चढवण्याची प्रथा आहे . सुरुवातीच्या काळात चांदीचे मुकूट बाबांना चढवले जात असे, त्यानंतर सुवर्ण मुकूटांची रीघ साईंच्या दरबारी लागली अन् आता हि-याचे मुकूट बाबांना दान दिला आहे.

COMMENTS