Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दान..

दान म्हणजे देणे.. एखाद्या गरजवंताला, गरिबाला, एखाद्या संस्थेला, अनाथ आश्रमाला, माणसांच्या समूहाला निस्वार्थ भावनेने केलेली मदत.. म्हणजे दान.. आता

उर्फी जावेदने गुपचुप उरकला साखरपुडा?
शिवसेना भवनासमोर मनसेकडून हनुमान चालीसा
महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी नवी मुंबईतील कार्यकर्ते सहभागी  

दान म्हणजे देणे.. एखाद्या गरजवंताला, गरिबाला, एखाद्या संस्थेला, अनाथ आश्रमाला, माणसांच्या समूहाला निस्वार्थ भावनेने केलेली मदत.. म्हणजे दान.. आता हे दान फक्त पैश्यांच्या स्वरूपातच असते असे नाही., एखादी वस्तू, अन्न-धान्य, कपडा-लत्ता, माहिती, ज्ञान सुद्धा दान असूच शकते. तसेच दान म्हणजे श्रीमंताने गरिबाला देणे, फक्त एवढेच.. असेही नाही, एखाद्या मध्यम वर्गीयाने दुसऱ्या मध्यम वर्गीयाला गरजेप्रमाणे मदत केली, तरीही ते दानच झाले. पण आजच्या आपल्या या मीपणाच्या जगात कोणाला कोणी दान करताना दिसतच नाही. काही श्रीमंत तर गरीबांकडे ढुंकून सुद्धा बघत नाहीत. क्वचितच हजारातून कोणी, संवेदनशील मनाचा.. काही कोणाला दान करतो. शिवाय “मी दान केलं तर माझं पुण्य वाढेल, त्यातून मला काही फायदा होईल”, याच भावनेतून ते असते. आपण आपल्या या मीपणाला एवढे चिकटलेले आहोत की दुसऱ्याला काही द्यावे, हा विचारच आपल्या मनात कधी येत नाही. आपण स्वतःला कुठून.. कसं.. भेटेल हाच विचार करत असतो.. म्हणजे “अपना काम बनता,  भाड़मे जाये जनता”.. शिवाय आपण जगतो, काही करतो, पैसे कमावतो., ते आपल्या परिवारासाठीच आणि त्यात सुद्धा आपला मीपणा आलाच की.. त्यात आता स्पर्धे चे युग आहे, हे आपण स्वतः ठरवलेच आहे, म्हणून दुसऱ्याला मदत करणे सोडाच,  पण त्याच्यावर पाय ठेवून त्याच्या पुढे कसे जाता येईल, हेच आपण बघत असतो. पण कोणाची गरिबी, कोणाची भूख, कोणाचे दुःख, कोणाची धडपड, आपल्या सारख्याच एखाद्या माणसाची अवहेलना.. आपल्याला दिसत नाही. आणि दिसली तरी, मान वाकडी करून आपण बाजूने निघून जातो.

“त्यानी मला मदत नाही केली, तर मी कशाला करू”..
“हल्ली मदतीच्या नावावर लुटलेच जाते”..
“मदत घेऊन समोरचा आपल्याला विसरून जाईल”..
“एकदा मदत केली तर तो सारखाच मागत बसणार नाही ना?..
माझी मदत चुकीच्या माणसांना तर जाणार नाही ना?..
असे असंख्य विचार.. असंख्य प्रश्न.. आपल्या मनात येतच असतात. पण जर हेच विचार.. हे प्रश्न जरा बारकाईने बघितले, तर यातच आपल्याला याचे उत्तर भेटेल.. जर आपण आपल्या इच्छेनुसार.. समजून-उमजून.. हुशारीने.. सर्व चौकशी करून.. आपल्या आर्थिक पातळी नुसार.. कोणा गरजवंताला, गरिबाला काही दान केले.. योग्य ती मदत केली.. तर या दुनियेत खूप मोठा बदल घडल्या शिवाय राहणार नाही.

 तर आपण आता असे बोलू की, “मी फार कमी कमावतो, मग मी कोणाला काय दान करू”.. तर आपण आपल्या कुवती प्रमाणे, आपली आर्थिक कमाई लक्षात घेऊन, दान करूच शकतो. किंवा आपल्या देशात 145 कोटी लोकं आहेत.. यामधील काही लोकांनी, ज्या लोकांची थोडी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, म्हणजे जे महिन्याला कमीत कमी 8 हजार जरी कमावतात, अशा लोकांपासून ते श्रीमंतातल्या श्रीमंत लोकांपर्यंत.. प्रत्येकाने कमीतकमी फक्त एक रुपयाची जरी मदत गरिबांना, गरजवंतांना केली, तरी जी एकूण मदत असेल ती किती मोठ्या स्वरूपात असेल.. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण अन्न-धान्य देऊन, कपडे देऊन, काही वस्तू देऊन.. ज्या गोष्टीची कोणाला खरी गरज आहे हे ओळखून.. आपल्या कुवती प्रमाणे दान करूच शकतो.. कोणाला दान करायचे आहे तो कसेही करेल, आणि ज्याला नाही, त्याला कितीही मार्ग दाखवले तरी तो करणार नाही. आधी आपल्याला दुसऱ्या विषयी संवेदना हवी.. दुसऱ्याच्या दुःखा विषयी डोळ्यात पाणी हवे.. दुसऱ्या विषयी आपुलकी हवी.. तरच ही गोष्ट साध्य होऊ शकते.. आणि असे केले तर हळू हळू देशातली पूर्ण गरिबी मिटल्या शिवाय राहणार नाही. पण आपण असा फक्त विचारच करू शकतो, हेच दुर्दैव आहे.

  शेवटी हे दान केल्याने आपला काही फायदा होईल का? सामान्य लोकांना हा प्रश्न सतावत राहणारच.. पण निस्वार्थ भावनेने, त्यातून काही न मिळण्याच्या अपेक्षेने, फायदा-तोटा च्या पुढला विचार करून एखाद्या गरिबाला, गरजवंताला केलेली मदत म्हणजेच “दान”.. तर म्हणून ही मदत निस्वार्थ भावनेनेच करायला हवी.. तसेच अन्न, पाणी, हवा, हे सर्वच देऊन या निसर्गाने आपल्या सर्वांना समान ठेवले आहे, मग आपणच या कमी जास्त पैश्यांवरून.. श्रीमंत गरीब हा भेदभाव का करावा?.. आपल्या सारख्याच असलेल्या एखाद्या माणसाने हलाखिचे जीवन का जगावे?.. आज आपण फार नशीबवान आहोत जे आपल्याला दोन वेळचं अन्न भेटतंय.. पण काहींना ते सुद्धा मिळत नाही.. म्हणून प्रत्येकाने आपल्या कमाई मधून थोडेतरी दान करायलाच हवे.. आणि यानेच आपला अहंकार संपेल.. आपला मीपणा संपेल.. आणि या मीपणाने पकडून ठेवलेले दुःख सुद्धा.. म्हणून कधी निस्वार्थ भावनेने.. कोणा गरजवंताला, गरिबाला, ज्याला मदतीची खरी गरज आहे अश्याला.. काही दान करून बघा.. या निसर्गात सर्व एक असल्याचा “भास” तरी नक्की होईल..

योगेश रोकडे नाशिक
9422892198

COMMENTS