Homeताज्या बातम्यादेश

कोलकात्यातील डॉक्टरांचा संप 41 दिवसांनी मागे

कोलकाता ः पश्‍चिम बंगालमधील कोलकाता येथे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ज्युनियर डॉक्टर आण

omg यूट्यूबवर १५९ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज एकदा बघाच!
नगरपंचायतीत सत्ताधार्‍यांचा अनागोंदी कारभार; हर्षवर्धन शेळके-पाटील यांचा आरोप
Solapur : वाळू तस्कराने चिरडलेल्या पोलिसावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

कोलकाता ः पश्‍चिम बंगालमधील कोलकाता येथे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ज्युनियर डॉक्टर आणि इतर सहकार्‍यांनी संप पुकारला होता. संप मागच्या 41 दिवसांपासून सुरु होता आता तो शुक्रवारी मागे घेण्यात आला आहे. 21 सप्टेंबरपासून सगळे डॉक्टर कामावर परतणार आहेत.
दोन दिवसांपूर्वी या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चर्चा झाली. त्यानंतर ज्युनिअर डॉक्टरांच्या बैठकीत संप मागे घेण्याचा हा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी हा संप जाहीररित्या मागे घेतला जाईल आणि शनिवारपासून डॉक्टर्स कामावर रुजू होतील. कोलकाता येथील आरजीकर रुग्णालयात महिला डॉक्टरवर अत्याचार करण्यात आला, मात्र आरोपीचा क्रूरपणा एवढ्यावरच थांबला नाही, त्याने त्या डॉक्टरची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेचा निषेध नोंदवत आणि पीडितेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी या ज्युनियर डॉक्टरांनी संप पुकारला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने देखील दखल घेतली होती. डॉक्टरांची सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांनी कामावर परतावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून आणि ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. सरकारतर्फे संपकरी डॉक्टरांशी सतत चर्चा सुरू होती, मात्र न्यायाची मागणी करत डॉक्टर्स त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. अखेर बर्‍याच चर्चा, बैठकांनंतर सुरक्षेच्या मुद्द्यावर ठोस उपाययोजनांची खात्री पटल्यानंतर महिन्याभरापासून अधिक काळ सुरू असलेला हा संप मागे घेण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

COMMENTS