Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामावर हजर होणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना अडवू नका; अन्यथा गुन्हे दाखल करू

सातारा / प्रतिनिधी : पगार वाढीची मागणी मान्य केल्याने काही कर्मचारी कामावर परत येत आहे. परंतू त्यांना इतर कर्मचारी अडवत आहेत. त्यांच्यावर दबाव नि

कराड पालिकेकडून वसुली विभागाचा कारवाईचा धडाका
प्रतापगड कारखान्यात संस्थापक सहकार पॅनेलची एकहाती सत्ता : सर्व 21 जागांवर विजय
महाबळेश्‍वर येथून वेण्णा नदी संवाद यात्रेचा उत्साहात प्रारंभ

सातारा / प्रतिनिधी : पगार वाढीची मागणी मान्य केल्याने काही कर्मचारी कामावर परत येत आहे. परंतू त्यांना इतर कर्मचारी अडवत आहेत. त्यांच्यावर दबाव निर्माण करत आहेत. त्यांना अडवू नका अन्यथा शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिला.
पोलीस निरीक्षक निंबाळकर म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. काही दिवसापूर्वी कामावर येण्याच्या कारणावरुन दोन एसटी कर्मचारीमध्ये वाद होऊन त्यांच्यामध्ये हाणामारी झाली होती. एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्यामुळे संपत चिघळला आहे. लालपरीची चाके थांबल्यामुळे अनेक विद्यालय महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि प्रवाशांची मोठी कुचंबणा झाली आहे. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सातारा बस स्थानकाला भेट देऊन कामावर जाणार्‍या एसटी कर्मचार्‍यांची अडवणूक करू नका, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला.

COMMENTS