नेवासे : ज्ञानेश्वर महाराजांनी विचारांचा दुष्काळ दूर व्हावा म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे रचना स्थान असलेल्या पवित

नेवासे : ज्ञानेश्वर महाराजांनी विचारांचा दुष्काळ दूर व्हावा म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे रचना स्थान असलेल्या पवित्र ठिकाणी ‘साधं सरळ’ या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. या पुस्तकात एका वाक्यातील विचार आकाशाला गवसणी घालणारे आहेत असे प्रतिपादन ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त हभप देविदास महाराज म्हस्के यांनी केले.
सोमवारी (दि. ९) सकाळी ज्ञानेश्वर मंदिरात ज्ञानेश शिंदे लिखीत ‘साधं सरळ’ पुस्तकाचे प्रकाशन माऊली चरणी अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग अभंग होते. व्यासपीठावर नेवाशाच्या माजी सभापती सुनीता गडाख होत्या. समाज माध्यमातून समाजासमोर चांगले विचार नेऊन, समाजातील हाताश, निराश झालेल्या माणसाला जीवन जगण्याचे बळ देऊ शकतात. अवघड काम कोणीच करत नाही सरळ सोपा मार्ग लोकांना आवडतो याचा उल्लेख पुस्तकात आहे. हे पुस्तक नवीन पिढीला दिशा देण्याचे काम करील असे देविदास म्हस्के महाराजांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना पांडुरंग अभंग म्हणाले मी लिहलेल्या ‘शेतमळा ते विधानसभा’ आत्मचरित्राचे मुखपृष्ठ ज्ञानेश शिंदे यांचे आहे. शिंदे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील वाक्य काळजाला जाऊन भिडतात. आजची तरुण पिढी कोणेचेही ऐकायाला तयार नाहीत परंतू त्यांना हे पुस्तक उपयोगी पडेल.
सुनीता गडाख यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या ज्ञानेश शिंदे यांचे साधं सरळ आहे म्हणून विचारांची प्रगती झाली. कडूभाऊंचे विचारधन सुंदर आहे. शिंदे यांचे पुस्तक शाळा,महाविद्यालय, देशात गेले पाहिजे त्यासाठी गडाख कुटुंबीयांकडून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास दिनेश व्यवहारे,स्नेहल भुजाडी, व्यंकटेश मल्टीस्टेटचे कृष्णा मसूरे,मच्छिंद्र व्यवहारे, संजय दळवी,अजित रसाळ, आबासाहेब काळे, नितीन केदारी, जालिंदर गवळी,योगेश रासणे, स्नेहालयच्या डाॅ.प्राजक्ता कुलकर्णी,डॉ. शिवाजी शिंदे, काकासाहेब गायके आदिंसह नागेबाबा परिवारातील सदस्य, भाविक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष भामरे यांनी केले. पुस्तका

COMMENTS