Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरावस्ती जि. प. शाळेच्या सौ. शुभांगी बोबडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

दहिवडी / प्रतिनिधी : माण तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या दरावस्ती (टाकेवाडी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील कार्यरत उपशिक्षिका स

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून योजनांचा लाभ घ्यावा; मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलींद जाधव यांचे आवाहन
हुतात्मा गटाच्या कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह माजी खा. राजु शेट्टी एकाच बँनरवर; राजकिय चर्चेला उधाण

दहिवडी / प्रतिनिधी : माण तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या दरावस्ती (टाकेवाडी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील कार्यरत उपशिक्षिका सौ. शुभांगी पंकज बोबडे यांची जिल्हा परिषद सातारा मार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
यावर्षीपासून जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या निवडीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवले होते. किमान 15 वर्षांची सेवा, सामाजिक कार्य, शाळेतील उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, हे महत्त्वाचे निकष ठेवण्यात आले होते. तसेच इतर तालुक्यातील गटशिक्षणाधिकार्‍यांच्या समितीमार्फत शाळेची व वर्गाची थेट तपासणी करून अंतिम निवड करण्यात आली. दि. 22 एप्रिल रोजी शिक्षकांनी पीपीटी प्रेझेंटेशन सादर केले.
सौ. शुभांगी बोबडे यांनी आपल्या शाळेत राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी तयार केलेले 400 हून अधिक शैक्षणिक युट्युब व्हिडीओ, नवसाक्षरता अभियानातील सहभाग, तसेच मतदान जनजागृतीसाठी केलेले कार्य हे विशेष उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी संगीत शिक्षण, गणित पेटीचा उपयोग करून बालबाजार, हस्तलिखित स्पर्धा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि इंग्रजी विषयावर प्रभुत्व यासाठी सातत्याने प्रयत्न केले. डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांनी वारली चित्रशैलीत रेखाटलेल्या भिंतीही त्यांच्या कल्पकतेचे दर्शन घडवतात.
त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, विस्तार अधिकारी रमेश गंबरे, केंद्र प्रमुख साधना झणझणे, मुख्याध्यापक अशोक गोरे, टाकेवाडीचे सरपंच निलेश दडस, उपसरपंच सिमा ताटे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय दडस व सर्व सदस्य तसेच पालकांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त केले आहे.
सौ. शुभांगी बोबडे यांचा हा सन्मान अन्य शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या कार्यामुळे दरावस्तीसारख्या दुर्गम भागातही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी वाट निर्माण झाली आहे.

COMMENTS