नांदेड प्रतिनिधी - गुजरात न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांना झालेली अटक व केंद्र शासना
नांदेड प्रतिनिधी – गुजरात न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांना झालेली अटक व केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले.
2019 साली कर्नाटक राज्यातील वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्यावर न्यायालयीन खटला सुरू होता. यावरून खासदार राहुल गांधी यांना अटक करण्यात आली. खासदार राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने नांदेडच्या आयटीआय परिसरात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी नांदेड काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलकांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
COMMENTS