सातारा : व्यवस्था जर न्याय देत नसेल तर सर्वसामान्य विश्वासाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात आणि न्याय मिळतो, अशी सर्वसामान्यांची धारणा. मात्र न्या
सातारा : व्यवस्था जर न्याय देत नसेल तर सर्वसामान्य विश्वासाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात आणि न्याय मिळतो, अशी सर्वसामान्यांची धारणा. मात्र न्यायव्यवस्थेलाच जर भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असेल तर बोलायलाच नको. अशीच घटना बुधवारा सातार्यात बघायला मिळाली. चक्क जिल्हा व सत्र न्यायायाधीश पाच लाखांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आणि एकच खळबळ उडाली.
जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्यानंतर यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यामध्ये न्यायाधीश महोदयांसाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना तिघांना रंगेहात पकडल्याने न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे. न्यायालय परिसरात न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे. सातार्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या घटनेची आता राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. यात फिर्यादीच्या वडिलांच्या जामीनासाठी लाच मागण्यात आली होती. पुणे आणि सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तपणे कारवाई करत सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयांनाविरोधच गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घटना घडामोडी घडत होत्या. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वांना रंगेहात पकडले. मात्र या सर्व घटनेमुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतांना दिसून येत आहे. त्यामुळे आता विश्वास ठेवायचा कुठे असा सवाल उपस्थित होत आहे.
विश्वास ठेवायचा कुणावर ?
खरंतर न्याय मिळण्याचे शेवटचे ठिकाण म्हणजे न्यायव्यवस्था. पोलिस यंत्रणेकडून अन्याय झाला तर सर्वात शेवटचे ठिकाण म्हणून आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावतो. मात्र आता न्यायाधीशच जर लाच घेतांना सापडत असेल तर, विश्वास ठेवायचा कुणावर? असा प्रश्न निर्माण होतांना दिसून येत आहे. पोलिस, व प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत. पण, थेट न्यायपालिकेतील वरिष्ठ अधिकारीच अडकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
COMMENTS