Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहरातील 69 दिव्यांग व्यक्तींना पिवळ्या शिधापत्रिकेचे वाटप

धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव

नाशिक - दिव्यांग व्यक्तींना देय असलेल्या लाभांतर्गत धान्य वितरण अधिकारी कार्यालय, नाशिक येथे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात मह

बार्शीत गौतमी पाटील चा कार्यक्रम पोलिसांनी बंद पाडला
समझदार सभी जानते है….. बिसलेरी !
Pune :जितेन गजरिया यांना पोस्टाने जुने चप्पल पाठवत युवतींचे आंदोलन | LOKNews24

नाशिक – दिव्यांग व्यक्तींना देय असलेल्या लाभांतर्गत धान्य वितरण अधिकारी कार्यालय, नाशिक येथे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांच्या हस्ते धान्य वितरण अधिकारी, नाशिक कार्यक्षेत्रातील 69 दिव्यांग व्यक्तींना पिवळ्या शिधापत्रिकेचे वाटप करुन अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात आला. अशी माहिती धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या शिबीरात श्रीमती कुलकर्णी यांनी उपस्थित दिव्यांग व्यक्तींना महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा 2015 च्या कायद्याबाबत मागदर्शन केले. धान्य वितरण अधिकारी कार्यालय, नाशिक यांनी राबविलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या शिबीराची प्रशंसा केली. श्री. जाधव यांनी दिव्यांग व्यक्तींना देय असलेल्या लाभाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या शिबीरास मोठ्या प्रमाणावर दिव्यांग व्यक्ती व त्यांचे कुंटुंबीय उपस्थित होते. 

या शिबीरास राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे उपसचिव सुनिल जोशी, कक्ष अधिकारी उदय कान्नव, सहायक कक्ष अधिकारी सचिन पोतदार, पुरवठा निरीक्षक शांताराम मोंढे, राहुल डोळसे, नितीन गायकवाड, वैशाली शिंदे, दिपाली घुगे, मंदा खैरे व धान्य वितरण अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. या शिबीराचे प्रास्ताविक धान्य वितरण अधिकारी श्री. जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन पुरवठा निरीक्षक श्री. मोंढे यांनी केले. 

COMMENTS