Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कातळापूरमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप

अकोले ः अकोले तालुक्यातील राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विदया मंदिर कातळापूर येथे मुंबई येथील मान्यवरांकडून शाल

सेवाभावामुळे आनंदऋषीजी हॉस्पिटलचा नावलौकिक
श्रीगोंदा बाजार समिती सचिव दिलीप डेबरे निलंबित
मताधिक्य वाढविण्यासाठी कामाला लागावे

अकोले ः अकोले तालुक्यातील राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विदया मंदिर कातळापूर येथे मुंबई येथील मान्यवरांकडून शालेय गणवेश तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
अक्षय कन्स्ट्रक्शन मुंबईचे विजय पवार तसेच अरविंद साळवे असिस्टंट डायरेक्टर इंडियन पोस्ट, रत्नाकर आढांगळे तहसीलदार, श्रीमती रत्ना गायकवाड शिक्षिका नाशिक, श्रीमती आशा पवार मॅनेजर नॅशनल इन्शुरन्स, राजेंद्र गायकवाड डेप्युटी एक्झिक्यूटिव्ह इंजिनिअर नाशिक आदी मान्यवरांनी विद्यालयास भेट दिली. यावेळी 35 विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. याप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे जेष्ठ संचालक  विजय पवार  तसेच शिक्षण निरीक्षक लहानू पर्बत, मुख्याध्यापक भाऊसाहेब बनकर यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे कातळापूर गावचे सरपंच  बाळासाहेब ढगे व सदस्य सक्रू खाडे त्याचप्रमाणे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद पहायला मिळाला.याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक भाऊसाहेब बनकर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पवार यांनी केले.सुत्रसंचलन गोरक्ष मालुंजकर यांनी केले तर आभार संपत धुमाळ यांनी मानले. या स्तुत्य उपक्रमाचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.मनोहरराव देशमुख,सचिव एम.एल. मुठे,माजी सचिव टि. एन. कानवडे, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, संचालक मिलिंदशेठ उमराणी, एस.टी.येलमामे, विजय पवार, अशोक मिस्त्री, शिक्षण निरिक्षक लहानू पर्बत आदींनी भरभरून कौतुक केले.

COMMENTS