पायी दिंडीतील वारकर्‍यांना ओआरएस पावडरचे वाटप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पायी दिंडीतील वारकर्‍यांना ओआरएस पावडरचे वाटप

श्रीसंत सावता माळी युवक संघाचा उपक्रम

अहमदनगर/प्रतिनिधी : विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजरात श्रीक्षेत्र शेंडी-पोखर्डी येथील श्रीमोरेश्‍वर व श्रीभैरवनाथ पायी दिंडीचे नगर शहरात शनिवारी (2 जुलै)

प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना
उपप्राचार्य नियुक्तीबद्दल ढमाले यांचा गावकर्‍यांच्या वतीने सन्मान
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकारण तापले

अहमदनगर/प्रतिनिधी : विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजरात श्रीक्षेत्र शेंडी-पोखर्डी येथील श्रीमोरेश्‍वर व श्रीभैरवनाथ पायी दिंडीचे नगर शहरात शनिवारी (2 जुलै) दुपारी आगमन झाले. स्टेट बँक चौकात या दिंडीचे स्वागत अखिल भारतीय श्रीसंत सावता माळी युवक संघाच्यावतीने संस्थापक-अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले. यावेळी पायी दिंडीतील वारकर्‍यांना श्रीसंत सावता माळी युवक संघाच्यावतीने ओआरएस पावडरचे वाटप करण्यात आले. वारीत पायी चालताना शरीरातील पाणी कमी झाल्यास व थकवा जाणवल्यास वारकर्‍यांनी ओआरएस पावडरचे सेवन करावे, असे आवाहन सचिन गुलदगड यांनी यावेळी केले.
टाळ-मृदुंगाच्या निनादात व विठूनामाचा गजर करीत या पायी दिंडीचे नगरला आगमन झाले. यावेळी माळी युवक संघटनेचे नगर तालुका सल्लागार लवेश गोंधळे, नगर तालुकाध्यक्ष सागर खरपुडे, सोपानराव राऊत, अविनाश शिंदे, संतोष शिंदे, बाबासाहेब पडवळे, नानाभाऊ सुसे, यादव सुसे, बबनराव शिंदे उपस्थित होते. यावेळी गुलदगड यांनी ओआरएस पावडरचे महत्व सांगितले. अतिसार आणि उलट्या यांसारख्या विकारांनी त्रस्त लोकांसाठी ते वापरले जाते. तसेच दिंडीत पायी चालताना थकवा जाणवल्यास, पाणी बदलामुळे पोटाचे विकार उद्भवल्यास,जुलाब सुरू झाल्यास या पावडरचे वारकार्‍यांनी सेवन करावे. ओआरएस हे क्षार आणि साखर यांचे मिश्रण आहे. यामधील मीठ आणि साखरेचे मिश्रण आतड्यांमधून पाणी आणि इलेक्ट्रोलाइट शोषण्यास उत्तेजित करते, ज्यामुळे अतिसार आणि उलट्या झाल्यास गमावलेले क्षार पुनर्स्थित करण्यात मदत होते, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी उपस्थितांनी टाळ गळ्यात घालून भजन म्हणण्याचा आनंद लुटला.

COMMENTS