Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समाज कल्याण व पंचायत समितीच्या वतीने लाभार्थ्यांना अनुदान वाटप

कोपरगाव/ प्रतिनिधी ः समाज कल्याण विभाग  जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती कोपरगाव यांचे मार्फत दिव्यांग-दिव्यांग विवाह झालेल्या जोडप्यासाठी तीस

कत्तली साठी दाबून ठेवलेल्या दहा गोवंश जनावरांची सुटका
संजीवनीच्या चार विद्यार्थ्यांची परदेशात निवड – अमित कोल्हे
आश्रमशाळा कर्मचार्‍यांचा जुन्या पेन्शनसाठी संप सुरूच

कोपरगाव/ प्रतिनिधी ः समाज कल्याण विभाग  जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती कोपरगाव यांचे मार्फत दिव्यांग-दिव्यांग विवाह झालेल्या जोडप्यासाठी तीस हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले. सदर दिव्यांग-दिव्यांग विवाह झालेल्या चांदेकसारे येथील  भाऊसाहेब कारभारी पारखे व अनिता भाऊसाहेब पारखे या जोडप्याच्या बँक खात्यावर सदर अनुदार वर्ग केलेबाबतचे पत्र लाभार्थीस चांदेकसारे येथे लाभार्थीचे घरीं  जाऊन कोपरगाव पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सहाय्यक गट विकास अधिकारी बाळासाहेब साबळे, विस्तार अधिकारी पंचायत बबनराव वाघमोडे व प्रशांत तोरवणे, तसेच सरपंच व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
तसेच  जिल्हा परिषद अहमदनगर समाज कल्याण विभाग  व पंचायत समिती कोपरगाव यांचेकडून सन 2022-23 या वर्षात जिल्हा परिषद 5 टक्के सेस फंडातून कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 35 लाभार्थींना प्रत्येकी 13 हजार रुपये प्रमाणे 4 लाख 55 हजार रूपये अनुदान मंजूर झाले असून ते लाभार्थींचे खात्यावर वर्ग करणयात आले आहे. समाज कल्याण विभाग 20 टक्के जिल्हा परिषद सेस फंडातून 21 लाभार्थ्यांना कडबाकुट्टी घेण्यासाठी प्रत्येकी  सव्वीस हजार रुपये प्रमाणे 5 लाख 46 हजार रुपयांचे अनुदान लाभार्थींचे खात्यावर वर्ग करणयात  आले आहे. तसेच 26 महिलांना शिलाई मशीन घेणेसाठी  प्रत्येकी 6 हजार 500 रुपये प्रमाणे 1 लाख 69 हजार रुपयांचे अनुदान लाभार्थींचे खात्यावर वर्ग केले आहे.  तसेच इयत्ता 5 वी ते 10 वी शाळेत शिक्षण घेणार्‍या 27 मुलींना लेडीज सायकल घेणेसाठी प्रत्येकी 6 हजार रुपये प्रमाणे 1 लाख 62 हजार रुपयांचे अनुदान लाभार्थींचे खात्यावर वर्ग केले आहे.
चौकटः
समाजकल्याण विभागामार्फत दरवर्षी घेण्यात येणार्‍या योजनांचा लाभ अनु जाती,अनु जमाती, भटक्या व विमुक्त जमाती यातील लाभार्थींनी घ्यावा
सचिन सूर्यवंशी.गटविकास अधिकारी पंचायत समिती कोपरगाव.

COMMENTS