औसा प्रतिनिधी - मनामध्ये ओलावा असेल तर त्यात रुजलेले माणुसकीचे अंकुर फुटायला वेळ लागत नाही. औसा तालुका र्फर्टीलाईझर्स असोशियशनने औसा तालुक्यातील
औसा प्रतिनिधी – मनामध्ये ओलावा असेल तर त्यात रुजलेले माणुसकीचे अंकुर फुटायला वेळ लागत नाही. औसा तालुका र्फर्टीलाईझर्स असोशियशनने औसा तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबाला मोफत खत उपलब्ध करून देऊन माणुसकीचा अंकुर समाजाला दाखविला असल्याचे प्रतिपादन औशाचे गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी केले.
गुरुवारी औसा तालुका र्फर्टीलायझर्स असोशियशन मार्फत तालुक्यातील आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबाला मोफत खताचे वाटप येथील पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी भुजंग पवार, तालुका कृषी अधिकारी संजयकुमार ढाकणे, औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अश्वजित साखरे, जयराम भोसले, चंद्रकांत दहिरे, तालुका असोसिएशनचे अध्यक्ष जयराज कारंजे, सहअध्यक्ष सचिन हूरदळे, उपाध्यक्ष नागनाथ पवार, सचिव जलील पठाण, कोषाध्यक्ष लियाकत शेख, माजी अध्यक्ष गोविंद फुटाणे यांच्यासह खत विक्रेते उपस्थित होते.
औसा तालुक्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. ही गोष्ट मनाला चटका लावणारी आहे. जगाचा पोशिंदा असा टोकाचा निर्णय का घेतो? याला अनेक कारणे असली तरी भविष्यात या आत्महत्या रोखण्यासाठी शासकीय स्तरावरून दमदार प्रयत्न केले जात आहेत मात्र या मानसिक आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला येथील असोसिएशनने माणुसकीचा हात पुढे करून खत उपलब्ध करून दिला. ही खूप समाधानाची आणि मानवतेचे पैलू उघडणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी अधिकारी भुजंग पवार यांनी शासन शेतक-यांसाठी राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली. शेतक-यांच्या जीवनात आर्थिक मजबुती येण्यासाठी फळबाग, दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, कुक्कुटपालन आदी जोड व्यवसायाची जोड द्यायचे आवाहन केले. पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी शेतक-यांनी व्यसनापासून दूर राहून स्वत:ला आत्मविश्वास गमावू नये असे आवाहन केले. यावेळी तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
COMMENTS