Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराजस्व अभियानांतर्गत डिस्कळमध्ये 374 शिधापत्रिकांचे वाटप

डिस्कळ : नवीन शिधापत्रिका वाटप करताना नायब तहसीलदार रविराज जाधव, पुरवठा अधिकारी श्रीकांत शेंडे, सरपंच डॉ. महेश पवार, मंडल अधिकारी अमृत नाळे व मान्यवर

लोधवडे येथे शाळा पूर्व तयारी पालक सभा उत्साहात
कोंडवे येथील गाडे वाड्याला आग; घरातील साहित्य जळून नुकसान
जिरवा-जिरवीसाठी विरोधकांनी पदाचा वापर : ना. अजित पवार

औंध / वार्ताहर : महाराष्ट्र शासनाच्या तहसिल कार्यालय खटाव, वडूज पुरवठा शाखा व ग्रामपंचायत डिस्कळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजस्व अभियानातर्गत डिस्कळ येथे 374 लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
तहसिलदार किरण जमदाडे यांच्या मागदर्शनाखाली महसुल नायब तहसीलदार रविराज जाधव, पुरवठा अधिकारी श्रीकांत शेंडे, उपलेखापाल विक्रांत खडसे यांनी डिस्कळ येथे महाराजस्व अभियान राबवून लाभार्थ्यांची होणारी धावपळ कमी केली. गावात शिधापत्रिकेचे वाटप करून शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. हे सिध्द करून दाखवले आहे. महाराजस्व अभियान कार्यक्रमांतर्गत नवीन शुभ्र शिधापत्रिका 4, केशरी शिधापत्रिका 76, केशरी दुबार 80, पिवळी दुबार 2, शिधापत्रिकेत नाव वाढविणे 165, नाव कमी करणे 47 अशा 374 लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप केले. यावेळी नायब तहसिलदार रविराज जाधव, पुरवठा अधिकारी श्रीकांत शेंडे, उपलेखापाल विक्रांत खडसे, मंडल अधिकारी अमृत नाळे, सरपंच डॉ. महेश पवार, उपसरपंच संदिप कर्णे, तलाठी अमोल जाधव, गणेश बोबडे, अमित हिरके, प्रीतम पडवळ, किशोर घनवट, सुखदेव रणसिंग, दादासो कदम, मनोहर लावंड व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

COMMENTS