Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात महिन्याभरात 1.34 लाख दाखल्यांचे वितरण

पुणे ः जेजुरी येथे होणार्‍या ’शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचे दाखले वितरण करणे रोखले नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्

अडीच महिन्यांच्या बाळासह आमदार सरोज अहिरे पोहचल्या विधानभवनात
वनरक्षक भरतीदरम्यान यवतमाळच्या तरूणाचा मृत्यू
बोगस वियाणे विक्री करणार्‍यांवर कारवाई करा

पुणे ः जेजुरी येथे होणार्‍या ’शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचे दाखले वितरण करणे रोखले नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आले आहे. गेल्या सुमारे महिनाभराच्या कालावधीत विविध प्रकारचे सुमारे 1 लाख 34 हजार दाखल्यांचे वितरण करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने 1 जून ते 9 जुलै 2023 या कालावधीत शपथपत्रासह नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र नुतनीकरण 3, उत्पन्नाचा दाखला 77 हजार 821, रहिवासी दाखला 2 हजार 673, वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास दाखला 24 हजार 635, पतदारी प्रमाणपत्र 23, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र 355, अल्पभूधारक दाखला 434 असे एकूण 1 लाख 34 हजार 245 दाखल्याचे नागरीक व विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे.

COMMENTS