Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जि. प. : समाजकल्याण विभागातर्फे ‘एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा

दिव्यांग व अव्यंग विवाह केलेल्या लाभार्थीचा सत्कार व युडीआयडीचे वाटप

नाशिक : महसूल व वन विभाग शासन निर्णय 30 जुलै 2024 नुसार जिल्हा परिषद नाशिक समाजकल्याण विभागाच्या वतीने 'एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा' य

कोलंबियात भूस्खलनामुळे 33 जणांचा मृत्यू
कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरवर समाजकंटकांनी फेकले शेण

नाशिक : महसूल व वन विभाग शासन निर्णय 30 जुलै 2024 नुसार जिल्हा परिषद नाशिक समाजकल्याण विभागाच्या वतीने ‘एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत  दिव्यांग व अव्यंग विवाह केलेल्या लाभार्थी यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, प्रभारी समाजकल्याण अधिकारी डॉ. संजय शिंदे उपस्थित होते.

अतिशय कमी कालावधीत समाजकल्याण विभागाच्या वतीने ‘एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा’ हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल व लाभार्थी यांनी देखील अतिशय कमी वेळात दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद देत आजच्या विशेष कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम लाभार्थी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर दिव्यांग व अव्यंग विवाह करणाऱ्या नवविवाहितांचे अभिनंदन करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी कार्डचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन विभागांच्या वतीने अधीक्षक मदन बढे यांनी केले.

दिव्यांग-अव्यंग विवाह योजनेचे लाभार्थी अनुक्रमे 1)रमेश पुंडलिक तिडके – वर्षा अशोक घडवजे, २) जितेंद्र बापु सोनवणे – प्रणाली रत्नाकर निकम ३) भोये रोहिदास रमेश- प्रमिला सावळीराम गावीत ४) सोमनाथ तुकाराम पदाडे – सोनी रामदास बोरसे ५) शिवराज सुधाकर भागवत – मोनिका अशोक सोनटक्के ६) चव्हाण दयानंद निंबा – वधु- देशमुख सकु दादाजी, ७) रुपेश कमलाकर दोंदे – पुजा कारभारी पगारे ८) प्रसाद शरद बोडके – नयना बाळकृष्ण काडगी ९) तुळशीदास नारायण मेघे – मनिषा घनश्याम गावित १०) रमेश काशिराम भोये – ममता रोडु चौरे

दिव्यांग युडीआयडी कार्ड देण्यात आलेले लाभार्थी : १) रोशन सुनिल पुराणिक २) आधार रमेश साळवे ३) मनियार उस्मान सैय्यद ४) आकाश देवानंद पगारे ५) सुशांत धनंजय सोमंवशी ६) सोनल पोपट देवरे ७) स्वरा चैतन्य मोरे ८) ओम नितीन शिंदे ९) अदित्य प्रशांत टोंगारे १०) आनंद गजानज जाधव ११) मोहमंद नजीम सलीम शेख १२)भावना भालचंद्र भावसार १३) गौरव संतोष पाटील

यांचे इ. लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले.

COMMENTS