गुवाहाटी : महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा पुढील अंक आता अपेक्षेनुसार कोर्टात रंगणार असल्याची आता दाट शक्यता आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांन
गुवाहाटी : महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा पुढील अंक आता अपेक्षेनुसार कोर्टात रंगणार असल्याची आता दाट शक्यता आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. या नोटिशीविरोधा एकनाथ शिंदे आता सुप्रीम कोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या चर्चेनंतर शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेत बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी 12 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी आणखी 4 आमदारांना अशा एकूण 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांनी बंडखोर गटातील 16 आमदारांना अपात्रेची नोटीस बजावली. त्यानंतर आता शिंदे गटाने या नोटीशीला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आहे. त्यामुळे त्यांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला आहे. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर शिंदे गट आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. शिंदे गट आता पक्ष प्रमुख ठाकरे यांना मात देण्यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
COMMENTS