Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाजार समितीतील अपहार प्रकरणी बडतर्फ सचिव अरुण काळे यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी 

नाशिक- बनावट पावती पुस्तक छापून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून ९० लाखांचा अपहार करण्यात आला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात

पन्नास रूपये चोरल्याने निर्दयी बापाने घेतला मुलाचा जीव
महिलांच्या कौतुकाने अजितदादा झाले भावुक… डोळ्यात आले अश्रू…
मुंबईत दीड कोटीचे अमली पदार्थ जप्त

नाशिक– बनावट पावती पुस्तक छापून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून ९० लाखांचा अपहार करण्यात आला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संस्थेच्या दप्तरात फेरफार करून संस्थेच्या नावाचे बनावट पावती पुस्तके तयार करून त्या बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्या सर्व रकमांचा अपहार केल्या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी तत्कालीन सचिव अरुण काळे यांना अटक केली आहे. काळे यांना बुधवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवार ता.५ ऑगस्ट पर्यंत दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित सुनील जाधव नामक व्यक्ती बाजार समितीत लिपिक (प्रतवारी कर ) या पदावर कार्यरत होता. १ डिसेंबर ते २४ मे २०२२ पर्यंत संशयित सुनील जाधव यांची जकात नाका मार्केट फि वसुली करीता देण्यात नेमणूक करण्यात आली होती. या दरम्यान बाजार फी वसुलीच्या काही रक्कमेचा भरणा त्यांनी बाजार समितीत केला होता. पावती पुस्तक क्रमांक ७५, ८७, ३०१, ३२३, ३६५, ३६६, ३८९, ४३५, ४४२, ४६९, ५२९ हे पावती पुस्तक संशयित जाधव यांना देण्यात आले होते. मात्र, संशयित जाधव यांनी बाजार फी वसुलीसाठी दिलेल्या या पावती पुस्तकाचा वापर केला नाही. परंतु याच क्रमांकांचे बनावट पावती पुस्तक बनवून बाजार फी वसुली केली आणि बाजार समितीने दिलेले पावती पुस्तक कार्यालयात जमा करीत पावत्याच फाडल्या नाही असे सांगितले.तसेच पावती पुस्तक क्रमांक ३०९ सुनिल विश्वनाथ जाधव यांना दिले नसतांना त्या माध्यमातुन बाजार फीची वसुली केली.बाजार समितीच्या एकुण १२ पावती पुस्तकांचा गैरवापर करून पावती पुस्तकांमध्ये खाडाखोड करून कृषी बाजार समिती नाशिक या संस्थेच्या दप्तरात फेरफार करून त्याव्दारे एकुण ८९ लाख ७७ हजार २००  रुपयांचा अपहार करून कृषी  बाजार समितीची फसवणुक व विश्वासघात केला. या प्रकरणी नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती सचिव प्रकाश घोलप यांनी सुनील जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.संशयित सुनील जाधव यांनी प्रथम नाशिक न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला मात्र, तो न्यायालयाने फेटाळला होता.त्यावेळी जाधव त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, या प्रक्रियेत उच्च न्यायालयाने काही  निरीक्षण नोंदविले. यात दोन वर्षांनी गुन्हा का नोंदविण्यात आला, विभागीय कारवाईत सेवा समाप्ती करण्यात आली. विलंब कारण हे प्रशासक असल्यामुळे झाल्याचे नमूद केले गेले. या गुन्ह्यात तत्कालीन सचिव संशयित अरूण काळे यांनी पोलिसांना तपास कामात सहकार्य केल नाही. तसेच न्यायालयात तारखेस वेळीच हजर राहणे, न्यायालयात मागितलेले कागदपत्र सादर न करणे. वेळोवेळी आदेश देऊन देखील त्याचे पालन न करणे या कारणाहून न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवार (ता.३०) रोजी सायंकाळी तत्कालीन सचिव अरूण काळे यांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी काळे यांना बुधवार (ता.३१ )रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

“काळे यांच्याकडे लागल्या अनेकांच्या नजरा – बाजार समितीतील अपहार प्रकरणात बडतर्फ सचिव अरुण काळे यांना अटक झाल्यानंतर त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान अरुण काळे याप्रकरणात काय काय खुलासे करतात याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. अपहार प्रकरणात इतर कोणी कर्मचारी सहभागी आहेत की अजून कोणी याबाबत  काळे यांच्याकडून काय काय माहिती मिळते हेही बघणे महत्वाचे आहे.

COMMENTS