Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित पवार यांच्या हटके टी-शर्टची विधीमंडळात चर्चा

अहमदनगर : कर्जत-जामखेडमध्ये रोजगाराच्या अडचणी सुटाव्या म्हणून एमआयडीसी आवश्यक आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मांडत

आ. रोहित पवारांच्या माध्यमातून उद्या विकासकामांचे भूमिपूजन
आ. रोहित पवार युवकांसह करणार उपोषण
आ. रोहित पवारांसमोरच दोन गटात हाणामारी (Video)

अहमदनगर : कर्जत-जामखेडमध्ये रोजगाराच्या अडचणी सुटाव्या म्हणून एमआयडीसी आवश्यक आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मांडत नुकतेच आंदोलन केले होते. युवकांच्या सह्यांचे पत्र देखील त्यांनी नुकतेच उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिले होते. बुधवारी तर त्यांनी हटके टी-शर्ट घालून विधानभवनात प्रवेश केला. क्रिम कलरच्या या जॅकेटवर कर्जत एमआयडीसीबाबत भाष्य करण्यात आले आहे. या टी-शर्टवर समोरच्या बाजूला मोठ्या अक्षरात एमआयडीसी असे लिहिले असून मागच्या बाजूला ध्येय विकासाचे ठेवूया, वेध भविष्याचा घेऊया, युवाशक्तीला संधी देऊया आणि फक्त मुद्दयाचे बोलूया!, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
या टी-शर्टबद्दल विचारले असता रोहित पवार म्हणाले की, हे टी-शर्ट मला माझ्या मित्राने दिले आहे. एका युवा मित्राने दिले आहे. मी जे मुद्दे विधानसभेत मांडत आहे त्याबाबत या युवाने मला हे जॅकेट दिले आहे. काही लोक समाजात खालच्या पातळीवर बोलून तेढ निर्माण करत आहेत. आज योगायोगाने आतमध्ये आलो तेव्हा उद्योग मंत्री उदय सामंत आले. उद्योग मंत्र्यांना देखील टी-शर्ट आवडले असेल तर त्यांनी उद्योगाचे प्रश्‍न सोडवावे. याबाबत त्यांनी ट्वीट देखील केले आहे, ज्यात त्यांनी या टी-शर्टच्या मागची गोष्ट सांगितली आहे.

COMMENTS