Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवेकी उपक्रमशीलता नव्या उपक्रमाला जन्म देते ः प्राचार्य शेळके

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः ज्याप्रमाणे ’सागरमंथना’तून अनेक मौलिक रत्ने मिळाली त्याप्रमाणे विवेकी उपक्रमशीलतेतून नव्या उपक्रमाचा जन्म होत असतो, त्यासा

गुणवत्ता आणि संस्कार हीच शिक्षणाची खरी ओळख ः प्राचार्य शेळके
महात्मा बसवेश्‍वर आणि कर्मवीर अण्णा यांचे विचार रुजले पाहिजेत ः प्राचार्य शेळके
डॉ. बखळे यांचा धाडसीपणा युवकांसाठी प्रेरणादायी ः प्राचार्य शेळके

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः ज्याप्रमाणे ’सागरमंथना’तून अनेक मौलिक रत्ने मिळाली त्याप्रमाणे विवेकी उपक्रमशीलतेतून नव्या उपक्रमाचा जन्म होत असतो, त्यासाठी माणसाने नेहमी कार्यप्रवृत्त असले पाहिजे तरच भविष्याची सकारात्मक वाट सापडते, असे उपक्रमशील व्यक्तिमत्व सुभाष वाघुंडे आहेत, असे मत माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर, शिरसगाव परिसरातील माऊली वृद्धाश्रमात मित्रपरिवाराच्या वतीने  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पुरोहित ओंकार कुलकर्णी यांनी मंत्रघोष करत आशीर्वाचन तसेच शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ बाबुराव उपाध्ये यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य टी. ई. शेळके होते. प्रमुख उपस्थिती म्हणून विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, कवयित्री संगीता फासाटे, पत्रकार राजेंद्र देसाई, प्रा. शिवाजीराव बारगळ आदींसह वृद्धाश्रमातील जेष्ठ स्त्रीपुरुष नागरिक उपस्थित होते. पुरोहित ओंकार कुलकर्णी यांनी वेदपठण जयघोष करत संस्थेचे  अध्यक्ष  सुभाष वाघुंडे यांचे औक्षण सौ.कल्पनाताई वाघुंडे, सौ.संगीता अशोकराव कटारे, फासाटे यांनी केले.सुखदेव सुकळे यांनी आपल्या नातेवाईकाच्या  वाढदिवसानिमित्ताने सुभाष वाघुंडे यांना  दोन हजार तर माऊली वृद्धाश्रमात जून 2023पासून सुरु होणार्‍या जानकी माऊली अनाथालय संस्कार केंद्र उपक्रमास प्राचार्य शेळके यांनी शाल व  एक हजार रुपये देणगी देऊन सत्कार केला.वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे फेटा बांधून, वाचनालयास पुस्तके भेट देण्यात आली.पत्रकार राजेंद्र  देसाई, सुखदेव सुकळे,प्रा.शिवाजीराव बारगळ,संगीता फासाटे, सौ.कल्पनाताई वाघुंडे यांनी मनोगत व्यक्त करीत सुभाष वाघुंडे यांचा सन्मान केला.प्राचार्य शेळके यांनी मनोगतात पुढे सांगितले. विविध  उपक्रमाचे आणि प्रबोधनाचे अमृतमंथन नेहमी चांगल्या कार्यास, प्रेरणादायी व  उपयुक्त ठरते. कारण सत्कार्य होण्यासाठी विविध कार्यक्रम होणे गरजेचे आहे,असे प्राचार्य शेळके यांनी सांगितले,संगीता फासाटे यांनी सुभाष वाघुंडे यांचा उपक्रम  सामाजिक सेवेचा असून सत्कार्याचा सत्कार असल्याचे सांगितले. सुभाष वाघुंडे म्हणाले, वृद्धाश्रमात निराधार, अनाथ मुलांसाठी जून 2023 पासून  वसतिगृह सुरु होत आहे, शिक्षण, संस्कार आणि आदर्श पालनपोषण  येथे होणार आहे, या वसतिगृहात गरजूंनी  प्रवेश घ्यावा, त्यासाठी लोकांनी हात पुढे करावे असे आवाहन सुभाष वाघुंडे यांनी मनोगतातून केले.गुरु ओंकार कुलकर्णी यांना ज्योतिष शास्त्रातील प्रथम क्रंमाकाचा  पुरस्कार पाप्त झाल्याने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सम्मान  करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर शुभम नामेकर यांनी आभार मानले.

COMMENTS