Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचित फॅक्टरची निराशाजनक कामगिरी

मुंबई ः लोकसभेच्या 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेली मतांची टक्केवारी आश्‍चर्यकारक होती. अनेक ठिकाणी वंचितच्या उमेदवाराला दुसर

महाबळेश्‍वरमधील अनाधिकृत बांधकामांवर हातोडा
सोनम कपूरच्या घरी आला नवा पाहुणा
रायगड जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या नूतनीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत ः मंत्री आदिती तटकरे

मुंबई ः लोकसभेच्या 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेली मतांची टक्केवारी आश्‍चर्यकारक होती. अनेक ठिकाणी वंचितच्या उमेदवाराला दुसर्‍या किंवा तिसर्‍या क्रमाकांवर मते मिळाली होती. त्यामुळे 2019 मध्ये काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसच्या जागा कमी झाल्या होत्या. यंदा 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येण्यास इच्छूक होती, मात्र वंचितला कमी जागा देण्याची तयारी दर्शवल्यामुळे अ‍ॅॅड. प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.
आघाडीशी बोलणी फिस्कटल्यामुळे वंचितला प्रचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, त्यातच निकालावरून वंचितच्या उमेदवारांना चांगल्याप्रकारची मते मिळू शकलेली नाही. महाविकास आघडीने चांगल्या जागा मिळवल्या असल्या तरी, राज्याने वंचित बहुजन आघाडीला नाकारल्याचे चित्र आहे. राज्यभरात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये लढत रंगली असल्याचे पाहायला मिळाले. मात्र वंचितच्या उमेदवारांना यंदाच्या निवडणुकीत सूर गवसत नसल्याचे दिसतंय. स्वतः वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून पिछाडीवर आहेत. महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची चर्चा फिस्टकटल्यानंतर आंबेडकरांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करत आपले उमेदवार उभे केले होते. मात्र राज्यात एकाही जागेवर वंचितच्या उमेदवाराला आघाडी घेण्यात यश आलेले नाही. पुणे, बीड, धाराशिव, परभणी आणि अकोला अशा महत्वाच्या मतदारसंघात वंचितने आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. विशेष म्हणजे मनसेला रामराम करून वसंत मोरे यांनीही वंचितमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पुण्यातून उमेदवार देण्यात आली होती. मात्र त्यांनाही आघाडी घेता आलेली नाही. वंचितने अकोल्यातून प्रकाश आंबेडकर, परभणीतून हवामान तज्ञ पंजाबराव डख, तर पुण्यातून वसंत मोरे आणि धाराशिवमधून भाऊसाहेब आंधळकर, बीडमध्ये अशोक हिंगे शिर्डीत उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी दिली होती. मात्र मतमोजणी सुरू झाल्यानंतर यापैकी एकाचेही नाव समोर आलेले नाही. त्यामुळे स्वतंत्र लढण्याच्या वंचितच्या भूमिकेला महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले नसल्याचे चित्र आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या वसंत मोरे हे पिछाडीवर आहेत. तर अकोल्यातून वंचितच्या प्रकाश आंबेडकरही मागे आहेत. बीडमधून वंचितचे अशोक हिंगे, परभणी लोकसभा मतदारसंघातून पंजाबराव डख, वंचितचे धाराशिवमधील उमेदवार भाऊसाहेब आंधळकर हे सर्व जण पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळतंय.

COMMENTS