Homeताज्या बातम्यादेश

अदानी मुद्यावरून इंडिया आघाडीत मतभेद

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असले तरी, अदानी मुद्यावरून काँगे्रसने सरकारची कोंडी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज सो

औरंगाबादमध्ये अभियंता अडकला हनीट्रपमध्ये
जेईई मेन्स परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा केला गौरव
धारेश्‍वर दिवशी येथे गाईचे ढोहाळे जेवन कार्यक्रम थाटामाटात

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असले तरी, अदानी मुद्यावरून काँगे्रसने सरकारची कोंडी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज सोमवारी देखील होवू शकले नाही. मात्र इंडिया आघाडीच्या नेत्यांची सोमवारी काँगे्रस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीत अदानी प्रश्‍नावरून इंडिया आघाडीत मतभेद दिसून येत आहे.
इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांचे मत आहे की, अदानी मुद्यावरून संसदेचे कामकाज होत नाही, मात्र आम्हाला इतर प्रश्‍न देखील मांडायचे आहेत, त्यामुळे इंडिया आघाडीत मतभेद असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी लोकसभेत केवळ 14 मिनिटे आणि राज्यसभेत सुमारे 15 मिनिटेच कामकाज चालले. यापूर्वी चार दिवसांत चार बैठकांमध्ये दोन्ही सभागृहात एकूण 40 मिनिटेच कामकाज होऊ शकले. तत्पूर्वी, इंडिया ब्लॉक नेत्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. त्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधीही सहभागी झाले होते. मात्र, टीएमसीचे नेते आले नाहीत. दुसरीकडे, सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यामुळे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सोमवारी लोकसभेत भारत-चीन मुद्द्यावर बोलू शकले नाहीत. अर्थमंत्री सीतारामन यांनाही बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडता आले नाही. त्यामुळे संसदेतील कामकाज होतांना दिसून येत नाही.

COMMENTS