Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमृतसागर दूध संघाचे संचालक बबनराव चौधरी यांचे निधन

अकोले ःअमृतसागर दूध संघाचे  संचालक,अंभोळ गावचे माजी सरपंच, विघ्नहर दूध संस्थेचे  संस्थापक चेअरमन बबनराव किसन चौधरी (वय-70, रा. अंभोळ) यांचे कळस य

बनावट ओळखपत्र बनविणा़र्‍यांचा धंदा तेजीत
हिवरेबाजार वाचवणार 8 कोटी 36 लाख लिटर पाणी…; नववर्षदिनी मांडला पाण्याचा ताळेबंद
पाटेगाव-खंडाळा ‘एमआयडीसी’ला जुलै अखेर मान्यता

अकोले ःअमृतसागर दूध संघाचे  संचालक,अंभोळ गावचे माजी सरपंच, विघ्नहर दूध संस्थेचे  संस्थापक चेअरमन बबनराव किसन चौधरी (वय-70, रा. अंभोळ) यांचे कळस येथे रस्ता अपघातात निधन झाले. समोरून येणार्‍या मोटारसायकलने धडक दिल्याने शनिवारी दुपारी अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुबंई येथे खासगी कंपनीत काम पाहणारे राजेश, औरंगाबाद येथे कंपनीत असणारे संजय चौधरी यांचे ते वडील होत.औरंगाबाद येथील पीएसआय शुभांगी ढगे-चौधरी यांचे ते सासरे होत. त्यांच्यावर रविवारी सकाळी अंभोळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह नातेवाईक, मित्र परिवार,नातेवाईक ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते. त्यांच्या अपघाती निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS