Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश

जि.प. विभागप्रमुखांची तालुक्यांना भेट

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी शुक्रवारी (दि.१७) रोजी सर्व विभागप्रमुखांना तालुक्यांना भेटी देण्याच्या सूचन

Ghansawangi : समृद्धी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न (Video)
महिला-पुरुषाकडून कॅशियरला मारहाण
छत्तीसगडमध्ये स्फोटात दोन जवानांना वीरमरण

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी शुक्रवारी (दि.१७) रोजी सर्व विभागप्रमुखांना तालुक्यांना भेटी देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुषंगाने कळवण, सुरगाणा, पेठ, इगतपुरी या तालुक्यांना जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी भेटी दिल्या. यावेळी तालुक्यातील सर्व विकासकामांचा आढावा घेत विकासकामे जलद गतीने करण्याबाबतच्या सूचना या गट विकास अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक वर्षा फडोळ यांनी पेठ तालुक्यास भेट दिली यावेळी मिशन भागीरथी प्रयास उपक्रमांतर्गत कामांचा शुभारंभ हा आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी कळवण तालुक्यास भेट देत आवास योजनांमार्फत सुरु असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून लाभार्थ्यांशी संवाद साधला.

इगतपुरी तालुक्यास उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी भेट देवून स्मशानभूमी नसलेल्या गावांची पाहणी केली, त्याचबरोबर नरेगा अंतर्गत सुरु असलेल्या कामांची देखील पाहणी त्यांनी केली. सुरगाणा तालुक्यास कार्यकारी अभियंता पंकज मेतकर यांनी भेट देत सुरगाणा तालुक्यांतर्गत सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी केली. यावेळी सर्व गट विकास अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी हे उपस्थित होते.

COMMENTS