Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेपर फुटी प्रकरणी अटक असलेल्या चौघा शिक्षकांना निलंबित करण्याचे निर्देश

बुलढाणा प्रतिनिधी - बारावीचा गणिताचा पेपर फुटी प्रकरणी पोलिसांसोबत शिक्षण विभाग देखील दोषींवर आपल्या माध्यमातून कारवाई करत आहेत. गणिताचा पे

वर्धा जिल्ह्यात सर्प दंशाने सर्पमित्राचा मृत्यू
आता एकनाथ शिंदे झाले शिवसेनेचे गटनेते ? आमदारांनी केली घोषणा | LokNews24
अर्थसंकल्पात शेतकर्‍यांना दिलासा मिळणार का ?

बुलढाणा प्रतिनिधी – बारावीचा गणिताचा पेपर फुटी प्रकरणी पोलिसांसोबत शिक्षण विभाग देखील दोषींवर आपल्या माध्यमातून कारवाई करत आहेत. गणिताचा पेपर फुटी प्रकरणी दाखल गुन्ह्यात साखरखेर्डा पोलीसांच्या ताब्यात असलेले चार आरोपी शिक्षकांना निलंबित करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने या चारही शिक्षणसंस्था संचालकांना दिले आहे. अशी माहिती बुलढाणा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली आहे.

बारावीच्या गणिताच्या पेपरफुट प्रकरणाची गंभीर दखल घेत अमरावती विभागीय मंडळाच्या सचिवांनी या चारही आरोपी शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याने चौघा आरोपी शिक्षकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. लोणार येथील झाकिर हुसेन उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अब्दुल अकील, अब्दुल मुनाफ, लोणार येथीलच सेंट्रल पब्लिक स्कुल व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक अकुंश पृथ्वीराज चव्हाण, किनगाव जट्टू येथील वसंतराव नाईक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचे शिक्षक गजानन शेषराव आडे आणि शेंदुर्जन येथील संस्कार ज्युनिअर कॉलेजचे गोपाल दामोदर शिंगणे या चारही शिक्षकांना निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

COMMENTS