संगमनेर ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट मानांकनासह देशातील ग्रामीण भागातील उत्कृष्ट महाविद्यालय ठरलेल्या व नेक चा ए प्लस दर्जा असले
संगमनेर ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट मानांकनासह देशातील ग्रामीण भागातील उत्कृष्ट महाविद्यालय ठरलेल्या व नेक चा ए प्लस दर्जा असलेल्या अमृतवाहिनी इंजीनियरिंग कॉलेजमधील आयटी विभागातील 40 विद्यार्थ्यांची साडेआठ लाखाच्या पॅकेजवर नोकरीसाठी थेट निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम ए व्यंकटेश यांनी दिली आहे.
विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने गुणवत तेथून आपला राष्ट्रीय पातळीवर लौकिक निर्माण केला आहे. अत्याधुनिक सुविधा, निसर्गरम्य परिसर ,शिस्तप्रिय वातावरण, स्वच्छता, आणि सर्व सुविधांमुळे हे महाविद्यालय ग्रामीण भागातील उत्कृष्ट महाविद्यालय ठरले आहे. सर्वोत्कृष्ट गुणवत्तेबरोबर विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर केलेल्या करारामुळे विविध कंपन्या संस्थेमध्ये येऊन कॅम्पस इंटरव्ह्यू मधून अनेक विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड करत आहेत. या अंतर्गत कॉग्निजंट, कॅबजीमनी, गोदरेज इन्फोटेक, परिसीस्टंट सॉफ्टवेअर, सेल्फमेड सॉफ्टवेअर सोल्युशन, पाय बाय थ्री, चेकमार्क इंडिया, रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स, ईगल बाइट सोल्युशन, नेट लिप, आयटी सोल्युशन, स्पायडर अशा विविध कंपन्यांनी यावर्षी कॅम्पस इंटरव्यू घेतले आहेत. यामधूनच चेकमार्क इंडिया या कंपनीने 2023 24 या शैक्षणिक वर्षातील 40 विद्यार्थ्यांना साडेआठ लाखाचे पॅकेज देऊन थेट नोकरीसाठी निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी क्षेत्रातील दर्जा ओळखून अमृतवाहिनी व्यवस्थापनाने विविध सामंजस्य करार केले आहे. या अंतर्गत विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी प्रकल्प स्पर्धा, तंत्रज्ञानाची सुसंगत तज्ञांची मार्गदर्शन, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आयटी कंपन्यांना भेटी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माजी विद्यार्थ्यांचा संवाद यातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. याचबरोबर मेरीटोरियस स्कॉलरशिप, जपान व जर्मन भाषांचे प्रशिक्षणही दिले जात आहे. या विद्यार्थ्यांच्या थेट नोकरीसाठी प्लेसमेंट विभागाचे प्रा. प्रवीण वाकचौरे, आयटी समन्वयक संदेश देशमुख व विभाग प्रमुख डॉ. बायसा गुंजाळ यांनी विशेष प्रयत्न केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे डॉ. जे बी गुरव ,प्राचार्य डॉ. एम ए व्यंकटेश, रजिस्टर प्रा विजय वाघे, आयटी विभाग प्रमुख डॉ.बायसा गुंजाळ यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS