Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वहिनीच्या हत्याप्रकरणी दिरास दुहेरी जन्मठेप

खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

बुलढाणा प्रतिनिधी - खामगाव तालुक्यातील गणेशपुर येथे झालेल्या जागेच्या वादातून वहिनीच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या दिराला न्यायालयाने आजन्म दुहे

मनपा कर्मचारी पतसंस्थेत सहकार पॅनलचा डंका
ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने पटकावले कांस्यपदक
पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन

बुलढाणा प्रतिनिधी – खामगाव तालुक्यातील गणेशपुर येथे झालेल्या जागेच्या वादातून वहिनीच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या दिराला न्यायालयाने आजन्म दुहेरी कारावासाची शिक्षा ठोठावली. खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. ए. एस. वैरागडे यांनी आज महत्त्वपूर्ण निकाल दिला. हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गणेशपूर येथे पांडुरंग मनोहर लठाड (२०) याने जागेच्या वादातून त्याची वहिनी दुर्गा गुणवंत लठाड (२०) यांना २६ नोव्हेंबर २०१६ रोजी पहाटे साडेचार वाजेदरम्यान अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत पीडितेला सुरुवातीला खामगाव, नंतर अकोला येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असताना २७ नोव्हेंबर रोजी दुर्गा हिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी अकोला शहर पोलिस स्टेशनच्या एपीआय सपना निरांजने यांनी मृत्यूपूर्व बयाण नोंदवले. हिवरखेड ठाण्यातील पोकॉ संजय जाधव यांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी आरोपी पांडुरंग लठाड विरोधात भादंवि कलम ३०७, ३०२, ४४९ अन्वये गुन्हा दाखल केला. दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयाने ११ साक्षीदार तपासले, यात मृतक महिलेचा पती फितूर झाला. मृतकाचे बयाण डॉ. नरेंद्र सरोदे आणि एपीआय निरांजने यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. त्यानंतर आज न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम ३०२ मध्ये आजन्म कारावास आणि १० दहा हजार रुपये दंड तर भादंवि कलम ४४९ मध्ये आजन्म कारावास आणि दहा हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रजनी बावस्कर (भालेराव) यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी घनोकार यांनी केली तर तपास अधिकारी म्हणून एपीआय नरेंद्र डंबाळे यांनी काम पाहिले.

COMMENTS