Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुपे बसस्थानकाची दुरवस्था; सगळीकडे चिखलाचे साम्राज्य

सुपे ः  पारनेर तालुक्यातील सुपा म्हणजे नगर-पुणे महामार्गावर वसलेले गाव, आणि अतिसंवेदनशील गाव म्हणून महसूल दप्तरी नोंद आहे. सुपा औद्योगिक वसाहतीचा

2012 पूर्वीची नियुक्ती दाखवून शिक्षक भरतीत करोडोचा घोटाळा : जि.प. सदस्य वाकचौरेंचा दावा
प्रदीप मकासरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
विनयभंग प्रकरणी अकोल्यातील भाजप नगरसेवकाला अटक

सुपे ः  पारनेर तालुक्यातील सुपा म्हणजे नगर-पुणे महामार्गावर वसलेले गाव, आणि अतिसंवेदनशील गाव म्हणून महसूल दप्तरी नोंद आहे. सुपा औद्योगिक वसाहतीचा वाढता आलेख पाहता अहमदनगर जिल्ह्यात सर्वात मोठी औद्योगिक वसाहत समजली जाते. कामगारांची आवक-जावक ही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. मात्र याच सुपे बसस्थानकाची दुरावस्था झाली असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे.
सुपा बस स्टँड हे नगर पुणे महामार्गावर असून सर्व बस येथे थांबतात. परंतु बस स्टँड हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने अनेक बस गाड्या स्टँडमधे येतच नाही. स्टँड परीसराच्या आवारात पावसाच्या पाण्याने घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. स्टँडमधे कुठल्याही प्रकारची सुविधा नसून अतिशय बिकट अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. एसटी महामंडळाची स्वताची 72 गुंठे जमीन असून भव्य असे बसस्टँडसाठी तब्बल दोन कोटी पन्नास लाख रुपये मंजूर होऊन एक वर्ष पूर्ण होत आले असून कोणतेही नवीन काम झालेले दिसून येत नाही. बसस्थानकाची इमारत कधी कोसळेल सांगता येत नाही. सदर इमारतीवर झाडे उगवल्याचे चित्र पहावयास मिळते ही वस्तुस्थिती आहे. बसस्थानकाभोवती भरपूर अतिक्रमने झालेले आहेत परंतु कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. काही काळापुरती अतिक्रमने भुईसपाट केली होती. लोकसभेची निवडणूक झाली आणी काही दिवसातच अतिक्रमणे जैसे थे झाली. ही राजकीय टोलेबाजी म्हणावी लागेल. कारण कायदा हा अतिक्रमण हटाव म्हणून राबवला जातो. आणि काही दिवसातच अतिक्रमणाच्या ठिकाणी परत दुकाणे, टपर्‍या उभे राहतात, त्याला लोकशाही म्हणावी का? हुकुमशाही, असा सवाल उपस्थित होत आहे. महामंडळाने त्वरीत निर्णय घेउन मोडकळीस आलेली बसस्टँडची इमारत बाजुला करुन नवीन इमारतीचे काम चालू करावे, तसे निवेदन ही ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, पालकमंत्री यांना दिलेले आहे.

COMMENTS