Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डिजिटल रुपया होणार लॉन्च ?

मुंबई/प्रतिनिधी ः भारतामध्ये डिजिटल रुपयाची चर्चा सुरू असतांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच डिजिटल रुपयांचा पायलट प्रोजेक्ट आरबीआय लवकरच सुरू करू

नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष अग्रवालांचा तडकाफडकी राजीनामा
भैरवनाथ केसरी कुस्तीच्या किताबाचा मानकरी प्रतीक चौरे यांना दोन किलो चांदीची गदा बहाल
नामदार थोरात यांनी केली गंगामाई घाट परिसराची पाहणी

मुंबई/प्रतिनिधी ः भारतामध्ये डिजिटल रुपयाची चर्चा सुरू असतांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच डिजिटल रुपयांचा पायलट प्रोजेक्ट आरबीआय लवकरच सुरू करू शकते. यासाठी काही मोठ्या बँकांचीही निवड करण्यात आली आहे.रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक अजय कुमार चौधरी यांनी रविवारी सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँक मनी मार्केटच्या व्यवहारांसाठी सेंट्रल बँक डिजिटल चलनचा पायलट प्रोजेक्ट लॉन्च करण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक या महिन्यात किंवा पुढील महिन्यात सेंट्रल बँक डिजिटल चलनचा पायलट प्रोजेक्ट लॉन्च करेल, अजय कुमार चौधरी यांनी जी 20 शिखर परिषदेत ही माहिती दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात लॉन्च करण्याची घोषणा केली होती. वित्त विधेयक, 2022 मंजूर झाल्यामुळे, कायदा, 1934 च्या संबंधित कलमात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. प्रोजेक्टसाठी नऊ बँकांची निवड केली आहे. या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी यांचा समावेश आहे. सेंट्रल बँक डिजिटल चलन बाजारात जसजसे वाढत जाईल, तसतशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांना डिजिटल सुरक्षेवर काम करावे लागेल. कारण आता ज्या प्रकारे सायबर गुन्हे घडत आहेत, त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँकेचे सर्व्हर आणि मोबाईल नेटवर्कसारख्या समस्यांना तोंड देण्याचे आव्हानही रिझर्व्ह बँकेसमोर असणार आहे.

COMMENTS