Dhule : गावाजवळील नाल्यात ट्रक चालकाने टाकले घातक विषारी रसायन (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Dhule : गावाजवळील नाल्यात ट्रक चालकाने टाकले घातक विषारी रसायन (Video)

धुळे तालुक्यातील नेर येथून जवळच असलेल्या सुरत-नागपूर महामार्गावर नवे भदाने गावाजवळील नाल्यात माथेफिरू ट्रकवाल्याने दुसऱ्या वेळेस विषारी रसायन टाकल्या

साधूसंतांचा व देवीदेवतांचा अवमान करणार्‍यांना मतदान करणार नाही : वारकरी संप्रदायाचा ठराव
कर्म असतं, कर्म या जन्मी करतो ते याच जन्मी फेडावे लागते : उदयनराजे भोसले
बेकायदेशीर काम बंद…मनपा कापणार कर्मचार्‍यांचा पगार

धुळे तालुक्यातील नेर येथून जवळच असलेल्या सुरत-नागपूर महामार्गावर नवे भदाने गावाजवळील नाल्यात माथेफिरू ट्रकवाल्याने दुसऱ्या वेळेस विषारी रसायन टाकल्याची घटना घडली आहे. काही दिवसापूर्वी  केमिकल टाकण्यात आले होते. हे पाणी पांझरा नदी गेल्याने मासे, बेडूक असे जलचर मृत्यू पावले होते. यामुळे नेर आणि भदाने येथील पाणीपुरवठा दूषित होऊन नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीच अशीच घटना घडली होती. त्यामुळे नेर आणि नवे भदाने गावाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पाण्याचे नमुने जिल्हा प्रयोगशाळेत पाठवल्यावर पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. आता पुन्हा ट्रक चालकाने याच नाल्यात केमिकल टाकल्याने ते नदीत जाऊन जीवजंतू नष्ट झाले आहेत. या केमिकलने गवत आणि झाडे जळाली आहेत. ट्रक चालकाने जेथे केमिकल टाकले तेथील गवतही सुकले आहे. केमिकल टाकणाऱ्या माथेफिरु ट्रक चालकाचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS