Homeताज्या बातम्या

राज्यस्तरीय रोप स्किपिंगमध्ये ‘ध्रुव’ची ४६ सुवर्णपदकांची कमाई

संगमनेर : नाशिकमध्ये पार पडलेल्या सातव्या राज्यस्तरीय रोप स्किपिंग स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचा बोलबाला बघायला मिळाला. मुला-मुलींच्य

. त्याशिवाय शिवसेना वरचढ ठरणार नाही !
कोंभळीत अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात
पोलिसांच्या चौकशीला योग्य उत्तर देणार | LOKNews24

संगमनेर : नाशिकमध्ये पार पडलेल्या सातव्या राज्यस्तरीय रोप स्किपिंग स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचा बोलबाला बघायला मिळाला. मुला-मुलींच्या स्वतंत्र गटात झालेल्या या स्पर्धेतील सर्व वयोगटात नेत्रदीपक प्रदर्शन करणार्‍या ‘धु्रव’च्या खेळाडूंनी तब्बल ४६ सुवर्ण पदकांसह २२ रौप्य आणि १५ कांस्य अशा एकूण ८३ पदकांची लयलुट केली.  क्रीडा प्रशिक्षक गिरीश टोकसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय रोप स्किपिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS