श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपालिकेतील आरोग्य विभागातील आस्थापनेवरील कायम रिक्त पदावरील सफाई कामगारांच्या वारसाना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार स
श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपालिकेतील आरोग्य विभागातील आस्थापनेवरील कायम रिक्त पदावरील सफाई कामगारांच्या वारसाना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सेवेत कायम करावे या मागणीसाठी अ.नगर जिल्हा नगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने कॉ. जीवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आलेले आहे.
श्रीरामपूर नगरपालिकेत कोर्ट आदेशाने सुमारे १८२ पेक्षा जास्त कर्मचारी हे विविध विभागात सन १९८८ साली कायम करण्यात आलेले होते. त्यापैकी ७३ कर्मचारी हे कायम सफाई कर्मचारी होते. सदर सफाई कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर मुदतीत अर्ज करुनही त्यांच्या वारसांना तातडीने वारसाहक्काने नियुक्ती देणे आवश्यक असतानाही त्यांना नियुक्ती न देता त्यांच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना सेवेत घेण्याची पध्दत गेली अनेक वर्ष सुरु आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अमंलबजावणीबाबत दि. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.तसेच सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी ही दि. ८ जानेवारी २०२५ रोजी या शासन निर्णयाची तातडीने काटेकोर अमंलबजावणी करण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत. तरीही श्रीरामपूर पालिका प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे.या निषेधार्थ व महाराष्ट्र शासनाने लाड – पागे समितीच्या शिफारशीच्या अंमलबजावणीबाबत दि.२४ फेब्रुवारी २०२३ रोजी निर्गमित केलेल्या सुधारित शासन निर्णयातील तरतुदीनुसार श्रीरामपुर नगरपालिकेतील कोर्ट आदेशाने कायम झालेल्या सफाई कर्मचा-यांच्या वारसांना सेवेत घेणेकरिता सदरचे धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे. या आंदोलनाला काँग्रेसचे करणदादा ससाने, बाबासाहेब दिघे, जय मातादी मित्र मंडळाचे माजी नगरसेवक राजेश अलघ,शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, मनसेचे बाबासाहेब शिंदे, सुधीर वायखिंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजीत लिपटे,माजी नगरसेवक के. सी. शेळके, शिवसेना ठाकरे गटाचे संजय छल्लारे, वंचित बहुजन आघाडीचे सुहास राठोड, आरपीआयचे विजूभाऊ पवार, समाजवादी पार्टीचे जोयब जमादार, आम आदमी पार्टीचे तिलक डूगरवार, कामगार नेते नागेश सावंत, प्रसाद चव्हाण, जितेंद्र चव्हाण, भीमशक्तीचे संदीप मगर, निर्भया महाराष्ट्र पार्टीचे गोरे यांनी पाठिंबा दिला. आंदोलनात नंदाताई गायकवाड, विजय शेळके,सूर्यभान सातदिवे, दीपक शेळके, संतोष केदारे, सुभान पटेल, शंकर शेळके ,जीवन बोकफोडे, किशोर पापा झिंगारे, नितीन जाधव, रामलाल चाबुकस्वार, भाऊसाहेब विधाटे, नंदा गायकवाड , पुष्पा बोरकर, सखुबाई काकफळे, ज्योती पवार, चंदा रूपवते, दिपाली चव्हाण, संगीता कोल्हे, विठाबाई आडागळे, वंदना साठे आधी सर मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.
COMMENTS