Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा 

 बीड प्रतिनिधी- बीडमध्ये धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय. यशवंत सेना धनगर समाज यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

बारामतीत रंगला ’तुतारी’ चिन्हाचा वाद
वारकर्‍याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी; दाम्पत्याचा जागीच अंत
केंद्रीकरण आणि विकास

 बीड प्रतिनिधी– बीडमध्ये धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय. यशवंत सेना धनगर समाज यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रतिमेवर काळी शाई टाकून त्यांची प्रतिमा जाळण्यात आली. धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही. असं विधान गावित यांनी केलं होतं. आणि याच विधानाच्या निषेधार्थ आज हे आंदोलन करण्यात आलंय. धनगर समाजाची पारंपरिक वेशभूषा परिधान करून समाज बांधव यात सहभागी झाले होते. 

COMMENTS