Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवाशाच्या पावन गणपतीला भाविकांची चतुर्थीनिमित्त गर्दी

नेवासाफाटा : नेवासा शहराच्या पूर्वेस नेवासाफाटा रोडवर असलेल्या पावन गणपती मंदिरात अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने मंगळवारी भाविकांनी दर्शनास

योगदिन आणि बिपीनदादा कोल्हेंच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
बारामतीच्या कृषी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
निर्मलसरिता पुस्तकाने संगमनेरच्या साहित्य संस्कृतीत भर ः आ.थोरात

नेवासाफाटा : नेवासा शहराच्या पूर्वेस नेवासाफाटा रोडवर असलेल्या पावन गणपती मंदिरात अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने मंगळवारी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अंगारक संकष्ट चतुर्थी असल्याने पहाटे पासूनच भाविकांनी येथे येऊन विघ्नहर्ता गणरायाला अभिषेक घातला तर गणेश भक्तांकडून यावेळी मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करण्यात आला.
                         अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने मंदिर सभामंडपामध्ये दिवसभरात असंख्य भाविकांनी विघ्नहर्ता गणपतीला अभिषेक घातले. अभिषेक घालण्यासाठी मंदिर सभा मंडपातच अभिषेक व्यवस्था करण्यात आली. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न ग्रामपुरोहित नंदकुमार जोशी यांनी केले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अँड. सुखदेव वाखुरे यांनी स्वागत केले. अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने पावन गणपती मंदिरास देवगड येथील गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांचे सेवेकरी हभप बाळू महाराज कानडे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मच्छिंद्र नाना हापसे यांनी भेट देऊन दर्शन घेतले.यावेळी पावन गणपती देवस्थानचे अध्यक्ष अँड.सुखदेव वाखुरे,सेवेकरी गोविंदराव कदम,पुजारी दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. विश्‍वस्त अँड. नरेंद्र लोंढे, संभाजीराव पवार, नारायण लष्करे, जगन्नाथ नागपुरे, व्यापारी देविदास साळुंके, उद्योजक अरुण रासने, शेतकरी युवा नेते त्रिंबकराव भदगले, ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव शिंदे, अरुण रासने नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंगारक संकष्ट चतुर्थी असल्याने दर्शनासाठी दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा ओघ सुरूच होता. मंदिर प्रांगणात प्रसाद स्टॉल व पान फुले नारळ यांची दुकाने थाटण्यात आली होती.सदरचे मंदिर हे जागृत असल्याने श्री क्षेत्र देवगड दत्त पिठाचे प्रमुख हभप महंत गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. नवसाला पावणारा  पावन गणपती अशी या देवस्थानची ओळख आहे. दर महिन्याच्या चतुर्थीला येथे गर्दी होत असते तर रात्री प्रवचनसेवेद्वारे प्रसादाचे वाटप केले जाते. वर्षभर देखील विविध धार्मिक कार्यक्रम मंदिर प्रांगणात होतात. पावन गणपती मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अँड. सुखदेव वाखुरे यांनी सर्व विश्‍वस्त भक्त मंडळाला बरोबर घेत  गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांचे मार्गदर्शन घेऊन आतापर्यंत मंदिर जीर्णोद्धारासह मंदिर प्रांगणात पेव्हर ब्लॉकसह संत निवास, स्वयंपाक कक्ष, देवस्थान कार्यालय अशी कामे झाल्याने मंदिर परिसराच्या वैभवात भर पडलेली आहे. नवसाला पावणारा पावन गणपती अशी ओळख असलेल्या या मंदिराच्या विकासासाठी गणेश भक्तांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत करावी असे आवाहन पावन गणपती मंदिर देवस्थान स्ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS