Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात ‘देवेंद्र पर्वा’ची पुन्हा सुरूवात !

मुंबई :गेल्या 12 दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावर कुणाची वर्णी लागेल? मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेईल, या प्रश्‍नांवर पडदा पडत गुरूवारी विविध दिग्गजा

कायदामंत्री किरेन रिजिजू अपघातात थोडक्यात बचावले
शेतकर्‍यांच्या ऐतिहासिक लढयाला बळ !
सेन्सॉर बोर्डाच्या नकारानंतर ’72 हुरेन’ चा ट्रेलर रिलीज

मुंबई :गेल्या 12 दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावर कुणाची वर्णी लागेल? मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेईल, या प्रश्‍नांवर पडदा पडत गुरूवारी विविध दिग्गजांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी देखील शपथ दिली. उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी 11 डिसेंबरनंतर होणार असल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन यांच्यासोबतच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.

देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 236 जागांवर विजय मिळवला. भाजपला 132, शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसर्‍यांदा शपथ घेतली आहे. 2014-2019 या कालावधीत त्यांनी पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले. 2019 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारचे ते 72 तासांसाठी मुख्यमंत्री होते. त्यानंतर ते तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले आहेत.

एकनाथ शिंदे पहिल्यांदा उपमुख्यमंत्री
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार की नाही याबाबतच्या चर्चा सुरु होत्या. त्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आणि शिवसेनेच्या आमदारांची मागणी मान्य करत एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. 2014-2019 या काळात प्रथम महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, त्यानंतर राज्य सरकारमध्ये नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये देखील ते नगरविकास मंत्री होते. यानंतर शिवसेना आणि भाजपचं सरकार स्थापन झाले तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले आहेत.

अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सहाव्यांदा शपथ घेतली. 2019-2024 या कालावधीतील तीन राज्य सरकारांमध्ये अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते. अजित पवार 2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले होते. आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दुसर्‍यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

शपथविधीपूर्वी राजकीय नाट्यावर पडला पडदा
शपथविधीच्या काही तासांपूर्वी मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे सहभागी होणार की नाही? असे अनेक तर्क वितर्क लढवण्यात येत होते. मात्र अखेरच्या क्षणी शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होण्यास तयार झत्तले. मात्र त्यापूर्वी राज्यात पुन्हा एकदा राजकीय नाट्य घडल्याचे समोर आले. शिवसेनेच्या वतीने सर्वच आमदारांनी एकनाथ शिंदेंना विनंती केली होती की कोणत्याही स्थितीत त्यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हायला हवे. शिवसेना आमदार, शिवसैनिक, महायुतीचे आमदार व देवेंद्र फडणवीसांनी स्वत: केलेली विनंती याला मान देऊन एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद घ्यायचे मान्य केले. आम्ही त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आलो होतो. त्यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शिफारसीचे पत्र आम्हाला त्यांनी दिले. ते आम्ही आता राजभवनावर येऊन प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्याकडे सुपूर्द केले आहे, असे शिवसेना पक्षाचे आमदार उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितले.

खा. शरद पवार, उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र, खा. शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारंसघाचे आमदार अभिजीत पाटील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते.

COMMENTS