ठेकेदारांच्या आंदोलनामुळे मनपाची विकासकामे ठप्प

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठेकेदारांच्या आंदोलनामुळे मनपाची विकासकामे ठप्प

अहमदनगर/प्रतिनिधी : वारंवार आश्‍वासने देऊनही महापालिका प्रशासनाने ठेकेदारांची सन 2011 पासूनची थकीत देयके अदा न केल्यामुळे मनपा ठेकेदार संघटनेने 30 नो

भिंगार परीसरात घरफोडी; दागिन्यासह व रोकड लंपास
कुंकूलोळ कुटुंबियांनी उभारले स्वखर्चातून बस निवारा शेड
मिटके यांनी डिग्रस प्रकरणात खाकी वर्दीचा अभिमान उंचावला -हरजितसिंह वधवा

अहमदनगर/प्रतिनिधी : वारंवार आश्‍वासने देऊनही महापालिका प्रशासनाने ठेकेदारांची सन 2011 पासूनची थकीत देयके अदा न केल्यामुळे मनपा ठेकेदार संघटनेने 30 नोव्हेंबरपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन तिसर्‍या दिवशीही सुरूच होते. त्यामुळे शहरातील छोटी-मोठी सर्व कामे ठप्प झाली आहे. या आंदोलनाची दखल घेऊन साधी चर्चाही प्रशासनाने संघटनेबरोबर केलेली नाही. त्यामुळे ठेकेदारांमध्ये असंतोष वाढला असून, आता आक्रमक पवित्रा घेतला जाणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष आनंद पुंड यांनी दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील विकासकामांची कोट्यवधी रुपयांची ठेकेदार संस्थांची देयके मनपा प्रशासनाने थकविली आहेत. सुमारे 35 ते 40 कोटींचे देयके थकीत आहेत. त्यामुळे ठेकेदार संस्था अडचणीत आलेल्या आहेत. ठेकेदारांच्या थकीत देयकांबाबत यापूर्वीही अनेकवेळा निवेदने दिलेली आहेत. आयुक्त शंकर गोरे यांच्याशीही वारंवार चर्चा झाली आहे. त्यांनी देयके देण्याबाबत आश्‍वासन दिले होते. मात्र, आजतागायत देयके अदा झालेली नाहीत. आयुक्तांशी झालेल्या चर्चेदरम्यान थकीत रकमेपैकी ठेकेदार संस्थांना प्रत्येकी दोन-दोन लाखांची देयके दिवाळीच्या दरम्याने देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही देयके अदा झाली नाहीत, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे. सन 2011-2012 व 2012-2013 या कालावधीतील काही देयके लेखा विभागातून गहाळ झालेली आहेत. याबाबत निर्णय घेऊन तातडीने देयके अदा करावीत. निविदा भरताना ठेकेदारांना जमा केली जाणारी 1 टक्का बयाणा रक्कम कार्यारंभ आदेश झाल्यानंतर ठेकेदारांना तत्काळ अदा करावी. सिक्युरिटी झिपॉझिटबाबत शहर अभियंत्यांना अधिकार द्यावेत. मूलभूत सुविधा योजनेत मनपाचा 30 टक्के स्वहिस्सा तातडीने जमा करावा, अशा मागण्या ठेकेदार संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही संघटनेने दिलेला आहे.

आज मनपात धरणे आंदोलन
आंदोलन सुरू होऊन तीन दिवस लोटले तरी यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. मनपा अधिकार्‍यांनी या आंदोलनाची साधी दखलही घेतलेली नाही. शहरातील विकास कामे बंद पडावीत, अशी आमची कोणतीही भूमिका नाही. मात्र, मनपा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कर्ज घेऊन ठेकेदारांनी कामे करण्यासाठी पैसे उभे केले आहेत. त्यांची देयके न निघाल्याने कर्जाची परफेड कशी करायची याचा प्रश्‍न ठेकेदारांसमोर आहे. त्यामुळे ठेकेदारांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ आज शुक्रवारी (दि.3) मनपा आयुक्तांच्या दालनात धरणे आंदोलन केले जाणार असून, बिले मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील, असे पुंड यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS