कोपरगाव शहर : शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी लढणाऱ्या 'शिक्षक भारती' या शासनमान्य संघटनेच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी (माध्यमिक विभाग) श्

कोपरगाव शहर : शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी लढणाऱ्या ‘शिक्षक भारती’ या शासनमान्य संघटनेच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी (माध्यमिक विभाग) श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे प्रा. दिगंबर जयश्री अशोक देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सन २०२६ ते २०२८ या ३ वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिक्षक भारतीचे पुणे विभाग कार्याध्यक्ष प्रा. महेश पाडेकर यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान केले.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्थापक आमदार कपिल पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे,विनाअनुदान विरोधी संघर्ष समिती महिला अध्यक्ष रुपाली कुरूमकर,राज्यसचिव सुनील गाडगे,माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप,उच्च माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष रामराव काळे, संघटक चंद्रशेखर हासे, चंद्रकांत शेठ ठोळे कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, डॉ. अमोल अजमेरे, आनंद ठोळे, राजेश ठोळे, अतुल कोताडे, मुख्याध्यापक रघुनाथ लकारे, उप मुख्याध्यापक अनिल अमृतकर, पर्यवेक्षक बलभीम उल्लारे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS