उपअधीक्षक मिटकेंची समर्थ निसर्गोपचार केंद्रास भेट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपअधीक्षक मिटकेंची समर्थ निसर्गोपचार केंद्रास भेट

ड़ॉ. सोनवणेंनी केले स्वागत, चिचोंडीच्या ग्रामस्थांशी केली चर्चा

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील समर्थ अ‍ॅग्रो सर्व्ह

प्रहारचा मराठा आरक्षण आमरण उपोषणाला पाठिंबा
पोलिसांवर संक्रांत…एकाला मारहाण, एकाच्या खुनाचा प्रयत्न
स्व. थोरातांना अभिवादन करून स्वीकारला पदभार

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील समर्थ अ‍ॅग्रो सर्व्हिसच्या निसर्गोपचार केंद्र व स्वामी समर्थ मंदिरास नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे होते. दैनिक लोकमंथन व लोकन्यूज 24 माध्यम समूहाचे प्रमुख संपादक डॉ. अशोकराव सोनवणे यांनी मिटके व शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून मिटके व शिंदे यांनी ग्रामसुरक्षा दल कामाचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील स्वामी समर्थ मठाच्या परिसरास समर्थ अ‍ॅग्रो सर्व्हिसच्या माध्यमातून निसर्गोपचार केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. राज्यभरातून स्वामी भक्त तसेच निसर्गोपचार प्रेमी येथे नियमित येत असतात. त्यामुळे येथे पोलिस उपअधीक्षक मिटके व पोलिस निरीक्षक शिंदे यांनी सदिच्छा भेट देऊन परिसरातील निसर्गरम्य वातावरणाची पाहणी केली. डॉ. सोनवणे यांनी त्यांना यावेळी चिचोंडी पाटील परिसराची वैशिष्ट्ये व माहिती सांगितली. निसर्गोपचार केंद्रातील विविध सुविधांच्या माहितीसह स्वामी समर्थ मठाद्वारे राबवल्या जात असलेल्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांचीही माहिती दिली.
यावेळी चिचोंडी पाटील गावाच्या सरपंच मंगलताई निक्रड, उपसरपंच परशूराम घोलप, ग्रामसेवक सागर खळेकर, विष्णु बोरुडे, चिचोंडी पाटील सेवा सोसायटीचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण खांदवे व सर्जेराव शिंदे, माजी सरपंच अजय बोरुडे आदींसह अन्य उपस्थित होते. जिल्हा पोलिस दलातर्फे चिचोंडी पाटील येथे ग्रामसुरक्षा दल कार्यरत करण्यात आले आहे. त्याच्या कामाबाबतची माहिती यावेळी उपअधीक्षक मिटके व पोलिस निरीक्षक शिंदे यांनी उपस्थित ग्रामस्थांकडून घेतली. गावच्या सुरक्षेच्यादृष्टीने ग्रामसुरक्षा दल नियमितपणे कार्यरत राहणे गरजेचे असून, पोलिसही यासाठी गावकर्‍यांना आवश्यक सहकार्य करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

COMMENTS