Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भुजबळ अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौर्‍यावर

नाशिक / प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार हे 2 ऑगस्ट रोजी नाशिक दौर्‍यावर गेले आहेत. नाशिक ह

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम (Video)
मंत्री भुजबळांच्या बेनामी संपत्तीच्या तक्रारी रद्द
राज्यातील कुंभार समाजाचे प्रश्न मार्गी लावणार- भुजबळ

नाशिक / प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार हे 2 ऑगस्ट रोजी नाशिक दौर्‍यावर गेले आहेत. नाशिक हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांचा गड मानला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पक्षातील कोणतेही वरिष्ठ नेते, राज्य मंत्री मंडळातील वरिष्ठ मंत्री नाशिक दौर्‍यावर गेले तर छगन भुजबळ हे या नेत्यांबरोबर असतात. मात्र, आज अजित पवार नाशिक दौर्‍यावर असून छगन भुजबळ हे त्यांच्याबरोबर उपस्थित नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न तापला आहे.

छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, गेले 15 दिवस मी मतदार संघात नव्हतो. मला आता माझ्या मतदार संघात जायचे आहे. तसेच येत्या 10 ऑगस्ट रोजी अजित पवार पुन्हा एकदा नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. तेंव्हा ते माझ्या मतदार संघात येतील. तेव्हा मी त्यांच्याबरोबर असेन. सध्या प्रत्येकजण आपापल्या मतदार संघावर लक्ष केंद्रित करत आहे. एकाच वेळी सर्व नेते एकाच ठिकाणी जाऊ शकतील असं होणार नाही. त्याचबरोबर माझी तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही. काल मी खूप त्रासदायक प्रवास केला आहे. त्यामुळे मी आज अजित पवारांबरोबर नसेन. याबाबत माझी अजित पवारांबरोबर चर्चा झाली आहे. ते मला म्हणाले, 10 तारखेला आपण एकत्र तुमच्या मतदारसंघात जाऊ. कारण एकाच वेळी, एकाच ठिकाणी सर्व आमदार एकत्र जाऊ शकत नाहीत.

COMMENTS