नाशिक : प्रश्नमंजुषा सारख्या कार्यक्रमातून विद्यार्थांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळत असतो असे प्रतिपादन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅ
नाशिक : प्रश्नमंजुषा सारख्या कार्यक्रमातून विद्यार्थांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळत असतो असे प्रतिपादन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (NIPM)चे अध्यक्ष राजाराम कासार यांनी केले. ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट तर्फे राष्ट्रीय प्रश्न मंजुषा चा भाग म्हणून NIPM नाशिक चॅप्टर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनसाठी प्रश्न मंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी ते विद्यार्थांना संबोधित करताना बोलत होते. नाशिक तर्फे आयोजित विभागीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न, प्रश्नमंजुषा सारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांसाठी एक विलक्षण अनुभवही आला असल्याचे ते म्हणाले. संदिप फाउंडेशन, MET, आणि IMRT MVPS सारख्या विविध संस्थांच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने या कार्यक्रमाची व्याप्ती वाढतच गेली आणि या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने प्रश्नमंजुषा कार्यक्रमातून स्पर्धात्मक वातावरण निर्मिती झाली.
या वेळी व्यासपीठावर अध्यक्ष श्री. राजाराम कासार, सचिव प्रकाश गुंजाळ, सहसचिव राजेंद्र आचारी व कार्यकारी मंडळ सदस्य विणेश मोरे उपस्थित होते. भविष्यातही आपण NIPM च्या माध्यमातून शाळा महाविद्यालये तसेच मनुष्यबळ विकास व्यवस्थापकीय अधिकारी यांचे विकासासाठी विविध कार्यक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. NIPM चे सचिव प्रकाश गुंजाळ यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट च्या कार्याची ओळख करून देताना निपमच्या शाखांचे जाळे देशभर पसरलेले असल्याचे सांगितले व त्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवले जात असल्याचे ते म्हणाले पुढे ते म्हणाले की कामगार अधिकारी ते एचआर व्यावसायिक असा प्रवास ठळकपणे मांडला, ज्यामुळे विद्यार्थ्याना मानव संसाधन क्षेत्रात त्यांचे करिअर कोणत्या विविध मार्गांवर जाऊ शकते याचा विचार करण्यास प्रेरित केले. निपमचे सहसचिव राजेंद्र आचारी यांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की प्रश्नमंजुषा कार्यक्रम राबवण्याच्या माध्यमातून महाविद्यालय व निपम यांच्यामध्ये एक आगळे वेगळे संबंध प्रस्थापित झाले. निपम च्या माध्यमातून भविष्यात कार्यक्रम राबवण्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापनाने पुढाकार घ्यावा असे ते म्हणाले. उद्योगातील व्यावहारिक अनुभव मिळवण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला, जे विद्यार्थी त्यांच्या करिअरची तयारी करत असताना त्यांच्यासाठी प्रश्नमंजुषा सारखे उपक्रम महत्त्वपूर्ण आहे असेही ते म्हणाले.
या परस्परसंवादांमुळे विद्यार्थ्यांना मौल्यवान ज्ञान आणि प्रोत्साहन मिळत असते कारण ते मानव संसाधन आणि संबंधित क्षेत्रात त्यांचा अभ्यास आणि भविष्यातील करिअरचा पाठपुरावा करतात. अभ्यासपूर्ण भाषणांबरोबरच NIPM नाशिक तर्फे आयोजित राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे यश देखील श्री. राजेंद्र आचारी आणि श्री. विनेश मोरे यांच्या अथक परिश्रमामुळेच मिळाले. त्यांनी केवळ प्रश्नमंजुषा आयोजित केली नाही तर सहभागी संस्थांशी समन्वय साधण्यात, कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला आणि विद्यार्थी पूर्णत: गुंतले आहेत याची खात्री करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी NIPM चे सहसचिव राजेंद्र आचारी व कार्यकारणी सदस्य विनेश मोरे यांनी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांशी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संपर्क साधून प्रश्नमंजुषा उपक्रमासाठी असंख्य विद्यार्थांनी सहभाग घेतला. विनेष मोरे यांनी कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित विद्यार्थी व अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.
COMMENTS