Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची विभागीय पातळीवर निवड

कोपरगाव प्रतिनिधी ः  अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुका क्रीडा संकुल येथे जिल्हा

प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्रदान
Ahmednagar : नगर – कल्याण महामार्गाचे काम सुरु…खा.विखे – आ .जगताप यांनी केली पाहणी | LokNews24
म्युकरमायकोसिसची औषधे कोठूनही मागवा l पहा LokNews24

कोपरगाव प्रतिनिधी ः  अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुका क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये डॉ सी एम मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी धनश्री शिंदे, सबुरी बारहाते, श्रद्धा गोंदकर, ज्ञानेश्‍वरी लोहकने यांची विभागीय पातळीवर निवड झालेली आहे.
तसेच तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चांगली कामगिरी करून सेजल बोरसे, प्रांजल शेजवळ, श्रद्धा पडवळ, कोमल संवत्सरकर यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. सदर विद्यार्थिनींना विद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख नितीन निकम, तुकाराम देवकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे रयत शिक्षण संस्था उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोषदादा काळे, स्कूल कमिटीच्या ज्येष्ठ सदस्या पुष्पाताई काळे, विद्यालयाच्या प्राचार्या प्रमोदिनी शेलार, उपमुख्याध्यापक रावसाहेब शिंदे, पर्यवेक्षक सुरेश सोनवणे, मेहबूब शेख सर्व सदस्य-स्थानिक स्कूल कमिटी, स्थानिक सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, सर्व सेवक, पालक व विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले.

COMMENTS