Homeताज्या बातम्यासंपादकीय

पुन्हा नोटबंदी अशक्यच ! 

राज्यसभेचे खासदार सुशीलकुमार मोदी यांनी सभागृहात शून्य प्रहरात दोन हजार रुपयांच्या नोटेवर बंदी आणण्याची मागणी केली. सुशील कुमार मोदी यांनी ही माग

माणसाला गुलाम करणारा बाजार !
ओबीसींवर अन्याय कराल, तर, परिणाम भोगाल ! 
नीती, गती आणि व्यवहार ! 

राज्यसभेचे खासदार सुशीलकुमार मोदी यांनी सभागृहात शून्य प्रहरात दोन हजार रुपयांच्या नोटेवर बंदी आणण्याची मागणी केली. सुशील कुमार मोदी यांनी ही मागणी करताना काही बाबी मांडलेल्या आहेत. त्यांच्या मते दोन हजार रुपयांच्या नोटा या बाजारपेठेतून गायब असल्यामुळे त्या कुठेही चलनात असल्याचे दिसत नाही. शिवाय, नोटबंदीनंतर २०१७-१८ नंतर या नोटांचा व्यवहार बाजारपेठेत कमी कमी होत गेला, असेही त्यांनी म्हटले. रिझर्व बँकेने देखील हे म्हटले आहे की २०१९ नंतर २००० च्या नोटांची छपाई करण्यात आलेली नाही. सुशील कुमार मोदी यांनी केलेले हे वक्तव्य अतिशय गंभीर आहे. परंतु,, यामागे निश्चितपणे २०२४ च्या निवडणुका लक्षात घेऊन विरोधी पक्षांना पुन्हा कमकुवत करण्याची एक रणनीती आहे काय? असा प्रश्न मात्र उपस्थित होऊ पाहतो आहे. कारण सुशील कुमार मोदी हे प्रामुख्याने बिहार मधील राजकीय नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत. २०२४ च्या दृष्टीने बिहार हे राज्य फार महत्त्वाचे होऊ पाहत आहे. कारण या राज्यातून नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांचे पक्ष एकत्र आलेले आहेत. हे दोन्ही पक्ष २०२४ च्या निवडणुकीत एकत्रित जर लढले तर निश्चितपणे भाजपाला बिहार आणि त्या अनुषंगाने राष्ट्रीय आघाडी जी काही होईल त्या माध्यमातून फटका बसू शकतो. अर्थात दोन हजार रुपयांच्या नोटेच्या बंदीची मागणी आणि बिहार मधील राजकीय पक्ष यांचा अर्थाअर्थी तसा संबंध नाही; परंतु, २००० च्या गुलाबी नोटा या भारतातील सर्वसामान्य जनतेच्या हातात नाही. याउलट भारतातल्या उद्योगपतींनी या नोटा डम्प केल्या आहेत की काय, अशी शंका आधीपासूनच उपस्थित होत आहे. परंतु, जे छोटे मोठे राजकीय पक्ष असतील त्या पक्षांनी जर समजा या नोटा संग्रहित ठेवल्या असतील तर या नोटबंदीचा त्यांना निश्चितपणे तोटा होईल. अर्थात नोटबंदी आता इतकी सहज शक्य राहिलेली नाही. कारण यापूर्वी तीन वेळा भारतामध्ये नोटबंदी करण्यात आली. त्यातील पहिली वेळ ही १९४६ यावर्षी नोटबंदी करण्यात आली होती. १९४६ मध्ये केलेल्या नोटबंदीत एक हजार आणि दहा हजारच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. तर १९७८ मध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान असताना १ हजार आणि दहा हजार  च्या नोटांना चलनातून बाद करण्यात आले होते. परंतु, त्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या हातात एवढ्या अधिक मूल्याची नोट जवळपास नसल्यात जमा असायची. त्यामुळे एकूण सामान्य जनतेवर या नोटबंदीचा फार फरक पडलेला नव्हता. परंतु सन २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदीचा मात्र सर्वसामान्य भारतीयांवर फार मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. कारण ही नोटबंदी सरसकट सर्व प्रकारच्या नोटांवर करण्यात आली होती आणि ही नोटबंदी करत असताना काळा पैसा बाहेर काढण्याचा एक उद्देश आहे, असे सरकारने जाहीर केले होते. परंतु, रिझर्व बँकेने त्यानंतर प्रस्तुत केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय चलनातील एकूण ९९.३०% एवढ्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या होत्या. याचा अर्थ कोणत्याही प्रकारचा काळा पैसा या नोटबंदीच्या निमित्ताने दिसून आला नाही. त्यामुळे ही नोटबंदी सर्रास फसलेली होती, अशी टीका अर्थतज्ञ, सामान्य जनता आणि राजकीय नेत्यांनी केली होती. या नोटबंदीच्या काळातच बँकांच्या समोर दीर्घ रांगा लोकांच्या राहिल्या. या रांगांमध्ये कधी चेंगरून तर कधी उन्हाने, पावसाने थंडीने अनेक लोकांची मृत्यू ही झाले. त्यामुळे ही नोटबंदी अतिशय भीषण अशी होती आणि ती सपशेल फसली आहे, असा आरोप आजही अर्थतज्ञ आणि विरोधी पक्ष करीत आहे. या नोटबंदी नंतर देशातील पंधरा कोटी नोकऱ्या या एका झटक्यात गेल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले होते. त्यामुळे, यापुढील काळात नोटबंदी करणे मोदी सरकारला देखील शक्य होणार नाही.

COMMENTS