Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनलक्ष्मी शाळेत उपक्रमातून साकारत आहे लोकशाही शिक्षण

नाशिक प्रतिनिधी - मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बालविद्यामंदिर व प्राथमिक शाळा, पाथर्डी फाटा, नाशिक येथील बालगटातील व

घोटी-सिन्नर महामार्गावर धामणगांव येथे अपघात
म्युकरमायकोसीच्या रुग्णांना मोठा दिलासा ; खासगी रुग्णालयांना उपचारांसाठी अवाजवी दर आकारता येणार नाही
बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक प्रतिनिधी – मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बालविद्यामंदिर व प्राथमिक शाळा, पाथर्डी फाटा, नाशिक येथील बालगटातील विद्यार्थ्यांनी ‘लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांची ओळख करून दिली. विविध प्रसारमाध्यमांच्या वेशभूषा यावेळी विद्यार्थ्यांनी साकारल्या. मोबाईल, वर्तमानपत्रे, रेडिओ, टेलिव्हिजन, यू ट्यूब, गुगल, पत्र, व्हाॅट्स अॅप अशा विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिकृती सादर करण्यात आल्या.

       संस्था संचलित सर्व शाळांमध्ये ‘लोकशाही शिक्षण’ हा एक विषय म्हणून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने बाल मनांमध्ये विविध उपक्रम, नाटीका, प्रकल्प, प्रश्नमंजुषा यांच्या माध्यमातून ‘लोकशाही’ ही संकल्पना राबवली जात आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही शासनव्यवस्था भारत देशाची आहे. परंतु सामान्य नागरिकांना लोकशाहीचे मूळ, तिचे महत्त्व, नागरिक म्हणून आपली जबाबदारी यांचे भान हरपत चालले आहे. हीच खंत सकारात्मक कार्यात बदलत संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांच्या संकल्पनेतून या महत्त्वाच्या विषयाला चालना देण्यात आली आहे. सक्षम व आदर्श नागरिक घडविणे या उद्देशाच्या कार्यपूर्तीसाठी शाळेतून लोकशाही शिक्षण देणे ही आजची आत्यंतिक महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

       सचिव तथा मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही रुजविण्यासाठी या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आदर्श भारताचे स्वप्न साकारण्यासाठी बालकांचे योगदान निश्चितच फलदायी ठरेल असा विश्वास ज्योती कोल्हे यांनी व्यक्त केला.

COMMENTS