Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळा परिसर व तंबाखूमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

अहमदनगर : शिक्षणतज्ञ, मुख्याध्यापक कुलकर्णी हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लक्ष घालून देखील सिताराम सारडा विद्यालयाच्या १०० मीटर आवारात

पाणी प्रश्‍न सुटण्यासाठी व्यापक लढा उभारणार ः कोल्हे
पत्रकार बाळ बोठेचा शोध घेणे ठरले आव्हानात्मक…
दरोडा व खुनाच्या गुन्ह्यातील फरारी सराईत गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर : शिक्षणतज्ञ, मुख्याध्यापक कुलकर्णी हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लक्ष घालून देखील सिताराम सारडा विद्यालयाच्या १०० मीटर आवारात ते पान स्टॉल दिमाखात पुन्हा सुरु झाले आहे. यावेळी माञ टपरी ऐवजी एका गाळ्यात सुरू झाले आहे. मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊन दोन आठवडे होत नाही तोच पुन्हा शाळेच्या आवारात राजरोसपणे धंदा सुरू झाल्यामुळे नागरिकांतून नाराजगी व्यक्त होत आहे. यामुळे शहर जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली असून किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शाळा परिसर तंबाखू मुक्त करून मुलांना खुल्या वातावरणात श्वास घेऊ द्या, या मागणीसाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना काँग्रेस शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देत चर्चा करण्यात आली. प्रशासन पुन्हा हत्याकांड होण्याची वाट पाहत आहे काय ? असा संतप्त सवाल काळे यांनी प्रशासनाला केला आहे.

COMMENTS