Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी घालण्याची मागणी

लातूर प्रतिनिधी- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करुन त्यांना बदनाम करु पाहणा-या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ या

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नव वधु-वरास दिल्या शुभेच्छा
सीमा व प्रशांत चित्ते यांच्या गायनाने  5 मे रोजी होणार बुद्धप्रभात.
अकोल्यातील अपघातामध्ये चौघांचा मृत्यू

लातूर प्रतिनिधी- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करुन त्यांना बदनाम करु पाहणा-या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ या मनुवादी वेबसाईटविरोधात बंदी आणून कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करुन त्यांना बदनाम करु पाहणा-या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ या मनुवादी वेबसाईटविरोधात बुधवारी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक यांच्याकडे या वेबसाईटवर बंदी आणण्याची आणि लेखकांवर व संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेंद्रे, शहर युवक अध्यक्ष समीर शेख, अनिल गायकवाड, विशाल विहीरे, सोहम गायकवाड, अ‍ॅड. प्रदिप पाटील, प्रविणसिंह थोरात, आदर्श उपाध्ये, अ‍ॅड. प्रदिपसिंह गंगणे, अ‍ॅड. सुहास बेंद्रे, राहुल बनसोडे, शकिल शेख, बबलू बागवान, राष्ट्रवादी अर्बन व आयटी सेल शहरजिल्हाध्यक्ष डी. उमाकांत यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS