वर्धा प्रतिनिधी - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधील गावामध्ये कचरा डेपो नसल्याकारणाने गावातील जमा झालेला कचरा उघड्यावर गावा बाहेर टाकल
वर्धा प्रतिनिधी – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधील गावामध्ये कचरा डेपो नसल्याकारणाने गावातील जमा झालेला कचरा उघड्यावर गावा बाहेर टाकला जातो.त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे दुर्गंधीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. परिसरातील कचऱ्याचा पाण्यावर आणि आरोग्यावर परिणाम होत आहेत. सुका आणि ओला कचरा एकत्र असल्याने किडे, मुंग्यांचा वावर अतिप्रमाणात होत आहे. पिण्याच्या पाण्यात देखील जंतु असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. कोंबडीला कोणी खाल्ल तर ते देखील त्या कचऱ्यात आणुन टाकले जाते. प्रशासनामार्फत कचरा डेपो बांधकाम करण्यात आलेले नाही. त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अतिप्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे कचरा गावाबाहेर टाकण्याची नागिकांची प्रशासनाकडे मागणी आहे.
COMMENTS