Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेट भागातील गटारी दुरुस्त करण्याची मागणी

अन्यथा दुग्धाभिषेक करून नगरपालिकेचा निषेध नोंदवणार

कोपरगाव ः कोपरगाव शहर हद्दीतील शुक्लेश्‍वर बेट भागातील गटारीची नगरपालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी कोपरगाव

जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत ध्रुवला सहा पदके
स्वच्छता अभियान ही लोकचळवळ व्हावी : डॉ. सागर बोरुडे
धार्मिक स्थळांना उत्पन्न नसल्याने कर सवलत क्रमप्राप्त – बाळासाहेब बोराटे

कोपरगाव ः कोपरगाव शहर हद्दीतील शुक्लेश्‍वर बेट भागातील गटारीची नगरपालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला निवेदन देत केली असून सदर निवेदनाची प्रत नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांनी स्वीकारली आहे.
सदर निवेदन देते प्रसंगी शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदीर प्रमुख प्रसाद पर्‍हे,आदिनाथ ढाकणे, बाळासाहेब गाडे आदी उपस्थित होते. शुक्राचार्य बेट भागातील रहिवाशांनी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव नगरपालिका हद्दीत जगातील एकमेव परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांचे मंदिर असून या ठिकाणी जगभरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात.परंतु या भागातील सर्व गटारींची अत्यंत दुरावस्था असून त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. मंदिरात दर्शनाला येणार्‍या भाविकांना तसेच स्थानिक रहिवाशाना या दुर्गंधीचा नाहक त्रास होत आहे.त्यामुळे कोपरगाव नगरपालिकेने तातडीने या भागातील गटारींची दुरुस्ती करत कोपरगाव शहराची गटारी वरून बाहेर होणारी बदनामी थांबवावी. अन्यथा आम्ही सर्व या गटारीचा दुग्ध अभिषेक करत नगरपालिका प्रशासनाचा निषेध नोंदवू असा इशारा या निवेदनाद्वारे नगरपालिका प्रशासनाला या भागातील रहिवाशांनी दिला आहे.

COMMENTS